हिंगोली येथे शनिवारी भन्ते विनयाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली पंचशील धम्मध्वज यात्रेचे आयोजन
महाराष्ट्राचे न्यूज नेटवर्क
11 सप्टेंबर 2025
13 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता जनसंवाद व रॅलीचे आयोजन, विविध जिल्ह्यांतील अनुयायांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित
हिंगोली शहरात शनिवार, दिनांक 13 सप्टेंबर रोजी भन्ते विनयाचार्य यांच्या नेतृत्वाखाली पंचशील धम्मध्वज यात्रा व जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या धम्मध्वज यात्रेचा हा एक भाग असून, हिंगोलीत होणाऱ्या या कार्यक्रमाला सामाजिक व बौद्ध अनुयायांचा मोठा प्रतिसाद लाभण्याची शक्यता आहे.
कार्यक्रमाचा प्रारंभ आणि रॅलीचा मार्ग
या दिवशी दुपारी 12 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. तेथून धम्मध्वज रॅलीची सुरुवात होऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी यांना महाबोधी महाविहार संदर्भातील निवेदन सादर केल्यानंतर, रॅलीचा समारोप स्व. शिवाजीराव देशमुख सभागृह येथे होईल.
भिमगीत व धम्मदेशन
दुपारी २ ते ४ या वेळेत भिमगीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून, त्यानंतर भन्ते विनयाचार्य यांचे मार्गदर्शन होणार आहे. या प्रवचनाद्वारे बौद्ध अनुयायांना सामाजिक जागृती, धम्म शिक्षण व बौद्ध संस्कृतीची जपणूक करण्याचे संदेश दिले जाणार आहेत.
महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाची पार्श्वभूमी
महाबोधी महाविहाराच्या स्वामित्वासाठी सुरू असलेला लढा हा नविन नसून, अनागरिक धम्मपाल यांनी सुरू केलेल्या या संघर्षाला भन्ते सुरई ससाई नागार्जुन यांनी दिशा दिली. अलीकडील काळात या लढ्याला नवी ऊर्जा देणारे भन्ते आकाश लामा, भन्ते विनयाचार्य, भन्ते के.के. राहुल, भन्ते सुमित रत्न यांचे कार्य उल्लेखनीय ठरले आहे.
पूर्वतयारीसाठी बैठक
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी 8 सप्टेंबर रोजी शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे बैठक घेण्यात आली. यावेळी भन्ते पय्यावर्धन, भन्ते बुद्धकिर्ती, भन्ते महाघोष आणि भन्ते कशपली यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी विशेष योगदान
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी खालील सामाजिक कार्यकर्ते व अभ्यासक विशेष परिश्रम घेत आहेत:
मिलिंद उबाळे, प्रा. डॉ. सुखदेव बलखंडे, रविंद्र वाढे, प्रा. डॉ. किशोर इंगोले, ॲड. सुभाष वाघमारे, प्रा. डॉ. कृष्णा इंगळे, प्रा. टी.एम. पोघे, प्रा. बाबासाहेब इंगोले, विनीत उबाळे, बंडू नरवाडे, प्रा. अमर मोरे, अक्षय इंगोले, बबन भुक्तार, प्रा. प्रशांत चाटसे, भिमराव सकपाळ, अनिल पुंडगे, सुधा सकपाळ, धाबेबाई आणि इतर कार्यकर्ते अखंड मेहनत घेत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा