जिल्ह्यात महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी मोहीम — ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान’ १७ सप्टेंबरपासून

जिल्ह्यात महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी मोहीम — ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान’ १७ सप्टेंबरपासून

हिंगोली, १४ सप्टेंबर :

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 

महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. ही मोहीम १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमधून राबविण्यात येणार असून, महिलांसाठी आरोग्य तपासणी, उपचार, समुपदेशन आणि आवश्यक असल्यास संदर्भ सेवा पुरविण्यात येणार आहेत.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अंजली रमेश यांनी महिलांना आवाहन केले आहे की त्यांनी या अभियानाचा लाभ घ्यावा आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी.


वअभियानाचे वैशिष्ट्ये :

या विशेष तपासणी मोहिमेंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील महिलांना खालील सेवा मोफत पुरविण्यात येणार आहेत :

  • स्तन व गर्भाशयाच्या कर्करोगाची प्राथमिक तपासणी
  • रक्तदाब व मधुमेह तपासणी
  • हिमोग्लोबिन तपासणी
  • सामान्य आरोग्य समस्यांसाठी वैद्यकीय सल्ला व उपचार
  • विशेषज्ञ डॉक्टरांची उपलब्धता

कुठे होणार तपासणी शिबिरे?

जिल्ह्यात एकूण १ जिल्हा रुग्णालय, २ उपजिल्हा रुग्णालय, ३ ग्रामीण रुग्णालय, २४ प्राथमिक आरोग्य केंद्रे, आणि १३४ उपकेंद्रांमध्ये ही शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.

सर्व सरकारी रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे व आरोग्यवर्धिनी केंद्रे या मोहिमेत सहभागी होतील.


महिलांसाठी आरोग्य तपासणीचे विशेष घटक  एनसीडी तपासणी – मधुमेह, उच्च रक्तदाब इ. असुरक्षित महिलांसाठी क्षयरोग तपासणी किशोरवयीन मुलींसाठी अशक्तपणा तपासणी व समुपदेशन आदिवासी महिलांसाठी सिकलसेल तपासणी व कार्ड वितरण गर्भवती महिलांसाठी प्रसूतीपूर्व काळजी तपासणी हिमोग्लोबिन तपासणी आणि पोषण समुपदेशन मासिक पाळी स्वच्छता व पोषणाविषयी जनजागृती सत्र तेल व साखरेचा वापर कमी करण्यासाठी महिला बचत गट व पंचायत प्रतिनिधींमार्फत मोहीम रक्तदान मोहीम आयुष्मान भारत अंतर्गत ‘वंदना कार्ड’ व ‘निश्चय मित्र’ स्वयंसेविका नोंदणी


लोकांना आवाहन :

या मोहिमेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरातील सर्व महिला – मातांचे आरोग्य तपासणीसाठी पुढाकार घेणे अत्यंत आवश्यक आहे. महिलांचे आरोग्य हे संपूर्ण कुटुंबाच्या सशक्ततेसाठी मूलभूत आहे.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अंजली रमेश, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी सर्व नागरीकांना या उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.





Post a Comment

थोडे नवीन जरा जुने