बिहारातील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या! हिंगोलीत भव्य धम्म रॅलीने प्रशासनाला दिले निवेदन

बिहारातील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या! हिंगोलीत भव्य धम्म रॅलीने प्रशासनाला दिले निवेदन

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
14 सप्टेंबर 2025
 हिंगोली प्रतिनिधी
बिहार राज्यातील बौद्धगया येथील महाबोधी महाविहार हे जागतिक कीर्तीचे, बौद्ध धर्मियांचे अत्यंत पवित्र व ऐतिहासिक धार्मिक स्थळ असून देखील, सध्या त्या ठिकाणी बौद्धेतर व्यक्तींचा अनधिकृत हस्तक्षेप आहे. या मंदिराचा संपूर्ण कारभार पुन्हा बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात द्यावा, तसेच महाबोधी मंदिर ट्रस्टमध्ये महाराष्ट्रातील एका भिक्खूला प्रतिनिधी म्हणून नियुक्त करावे, यासारख्या मागण्यांसाठी हिंगोली येथे 13 सप्टेंबर रोजी भव्य धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
ही धम्म रॅली भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरु होऊन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघाली. रॅलीदरम्यान शिस्तबद्ध पद्धतीने हजारो महिला-पुरुष, युवक-युवती, हातात धम्मध्वज घेऊन सहभागी झाले होते. बौद्ध भिक्खू व अनुयायांनी बौध्दगया मंदिर आमचं आहे, महाविहार बौध्दांच्या ताब्यात द्या, बौद्ध प्रतिनिधीची नियुक्ती करा, अशा घोषणा देत प्रशासनाचे लक्ष वेधले.

प्रशासनाला निवेदन सादर
जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांना प्रतिनिधींनी लेखी निवेदन सादर केले. हे निवेदन केंद्रीय गृहमंत्री, बिहारचे राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्याकडे देखील पाठवले जाणार असल्याचे आश्वासन या वेळी देण्यात आले.
 मागण्या व मागील इतिहास
महाबोधी महाविहार हे तथागत भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेले स्थान असून, जगभरातील बौद्ध अनुयायांसाठी अत्यंत पवित्र तीर्थस्थान आहे. १९४९ मध्ये बिहार सरकारने "महाबोधी मंदिर कायदा" लागू करून या स्थळावर बौद्धेतर प्रतिनिधींचा सहभाग वाढवला. या विरोधात आता देशभरातून बौद्ध समाजाने आवाज उठवायला सुरुवात केली आहे.

बौद्ध धर्मियांच्या मते, हे धर्मस्थळ पूर्णतः बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात असले पाहिजे, आणि या जागतिक वारशाचे रक्षण करण्यासाठी बौद्ध भिक्खूंचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे.
 रॅलीचे नेतृत्व व मार्गदर्शन
या रॅलीचे नेतृत्व व मार्गदर्शन पु. विनयाचार्य भिक्खू, पु. भिक्षु मुदितानंद येरो, पु. बुद्धकिर्ती थेरो, पु. भिक्खू चंद्रमुनी, पु. निभ्णु धम्मधोष, भिक्खू पंथ्यावर्धन, भिक्खू संघप्रिय, भतेप्राधि, भार्याथम नैना, सारिपुत्त भन्ते, भन्ते शासन ज्योती यांनी केले.

 मान्यवरांची उपस्थिती
या वेळी मधुकर मांजरमकर, दिवाकर माने, मिलिंद उबाळे, प्रा. डॉ. सुखदेव बलखंडे, बडु नरवाडे, प्रा. डॉ. किशोर इंगोले, प्रा. प्रशांत चाटसे, अमर मोरे, प्रा. डॉ. कृष्णा इंगळे, रविंद्र वाढे, टी.एम. पोघे, अक्षय इंगोले, अॅड. रावण धाबे, अॅड. सुभाष वाघमारे, अनिल पुंडगे, भिमराव सपकाळ, बबन भुक्न्तर, प्रा. बाबासाहेब इंगोले, योगेश नरवाडे, लखन खंदारे, नितीन खिलारे, प्रकाश इंगोले, ज्योतीपाल रणवीर, मनीषा वाढवे धम्मदीक्षा खंदारे  बेबी सरतापे वैशाली बलखंडे दैवता नरवाडे सुजाता पुंडगे वंदना घोंगडे गोदावरी वाढवे  गंगासागर वाढवे  वैशाली वाठोरे   शांताबाई धाबे,  सुद्धा सपकाळ यांच्यासह विविध क्षेत्रातील कार्यकर्ते, महिला व युवक उपस्थित होते.

 बौद्धगया – जागतिक वारसा, पण कोणाच्या ताब्यात
महाबोधी महाविहार युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असूनही, त्याचे व्यवस्थापन आजही वादग्रस्त आहे. बौद्ध समाजाचे म्हणणे आहे की, "हे स्थळ आमच्या धर्मगुरूच्या ज्ञानप्राप्तीचे ठिकाण असून, त्याचे व्यवस्थापन इतर धर्मियांच्या हाती असणे हे अन्यायकारक आहे."

धम्म रॅलीच्या माध्यमातून बौद्ध समाजाने आपला संताप आणि मागण्या ठामपणे मांडल्या आहेत. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन आवश्यक पावले उचलावीत, अशी या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. येत्या काळात या चळवळीला राष्ट्रीय स्वरूप मिळू शकते, अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने