मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा हिंगोलीत भव्य सत्कार सोहळा
हिंगोली | प्रतिनिधी | महाराष्ट्र २४ न्यूज नेटवर्क
ता. १३ सप्टेंबर २०२५
हिंगोली जिल्हा वकील संघाच्या वतीने दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी, मुंबई उच्च न्यायालयाच्या माननीय न्यायमूर्तींचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हिंगोली जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमात नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती मा. अनिल एस. किलोर यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार असून, औरंगाबाद खंडपीठाचे पालक न्यायमूर्ती मा. आर. एम. जोशी हे अध्यक्षस्थानी असतील.
या भव्य सत्कार सोहळ्याच्या वेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा. अभय जे. मंत्री, तसेच अतिरिक्त न्यायमूर्ती मा. सचिन एस. एम. देशमुख आणि मा. महेंद्र नेरलीकर यांची मान्यवर उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत हिंगोली जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. तुफानसिंग एस. अकाली, तसेच महाराष्ट्र व गोवा वकील परिषद अध्यक्ष अॅड. अमोल सावंत, व परिषद सदस्य अॅड. सतीष ए. देशमुख हे देखील सामील होणार आहेत.
या गौरव सोहळ्याचे आयोजन हिंगोली जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. सुनिलकुमार भुक्तार आणि सचिव अॅड. अखिल अहमद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. त्यांनी सर्व न्याय क्षेत्रातील मान्यवर, वकील बांधव आणि नागरिकांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
या कार्यक्रमामुळे हिंगोलीत न्याय व्यवस्थेच्या मान्यवरांचे एकत्रित दर्शन होणार असून, जिल्ह्याच्या न्यायिक वकिलांना एक वेगळा अनुभव आणि प्रेरणा मिळणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा