5000 रुपयांच्या लाचप्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर!
हिंगोली (प्रतिनिधी)
महाराष्ट24न्यूज नेटवर्क
5000 रुपयांच्या लाच मागणी प्रकरणात अटक झालेल्या सोनबा पंडितराव पतंगे यांना जिल्हा व सत्र न्यायालय, हिंगोली यांनी नियमित जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणाने अलीकडेच हिंगोली जिल्ह्यात मोठी खळबळ उडवली होती.
दिनांक 08 ऑक्टोबर 2025 रोजी कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. 545/2025 अंतर्गत कलम 7, 7(अ), 12 – भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तक्रारीनुसार, तक्रारदाराच्या वडिलांना मंजूर घरकुलाचा दुसरा हप्ता मिळण्यासाठी आवश्यक असलेला संयुक्त नजरी अहवाल सही करून पुढे पाठविण्यासाठी आरोपीने 5000 रुपयांची लाच मागितली होती. त्या तक्रारीनंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली होती.
या प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड. अजय (बंटी) पंडीतराव देशमुख यांनी जिल्हा व सत्र न्यायालय, हिंगोली येथे जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायाधीश श्री. पी. जी. देशमुख यांनी दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून आरोपीस नियमित जामीन मंजूर केला.
आरोपींच्या बाजूने ॲड. सतीश देशमुख, ॲड. शामकांत देशमुख, ॲड. प्रदीप देशमुख, ॲड. प्रदीप लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. अजय (बंटी) देशमुख यांनी प्रभावी युक्तिवाद सादर केला.
त्यांना सहकार्य करणाऱ्यांमध्ये ॲड. शरद देशमुख, ॲड. अदित ऊर्फ शुभम देशमुख, ॲड. राहुल देशमुख, ॲड. योगेश खिल्लारी (पाटील), ॲड. अविनाश राठोड, ॲड. रजत देशमुख, ॲड. प्रकाश मगरे, ॲड. विराज देशमुख, ॲड. आनंद खिल्लारे, ॲड. सुमित सातव, ॲड. मुदस्सीर अ. रहिम, ॲड. लखन पठाडे, ॲड. श्रद्धा जैस्वाल, ॲड. आकाश चव्हाण, ॲड. गजानन घुगे, ॲड. सुजित गायकवाड, ॲड. शुभम कदम, ॲड. सुमित कदम, ॲड. तुषार, ॲड. रुपाली खिल्लारे, शेख आदील शेख अजीस, ॲड. तुषार देशमुख, ॲड. सचिन सोनुने, ॲड. संदीप डवले आदींचा समावेश होता.
टिप्पणी पोस्ट करा