हिंगोली : शरद पवार राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी मुनीर पटेल यांची निवड

हिंगोली : शरद पवार राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी मुनीर पटेल यांची निवड

महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क 
24  ऑक्टोबर 

हिंगोली जिल्हा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवे नेतृत्व लाभले आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते व माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या आदेशानुसार मुनीर पटेल यांची हिंगोली जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

यापूर्वी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिलीप चव्हाण यांच्या अंगावर होती. मात्र त्यांनी नुकताच आपला राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर जिल्ह्यात नवीन नेतृत्व निवडण्याची प्रक्रिया सुरू होती. त्या अनुषंगाने आज अधिकृत घोषणा करण्यात आली.

नवीन जिल्हाध्यक्ष म्हणून मुनीर पटेल यांच्या निवडीचे पक्षातील कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात येत आहे. पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि हिंगोली जिल्ह्यातील जनतेपर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचवण्यासाठी ते प्रभावीपणे काम करतील, असा विश्वास जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
या नियुक्तीमुळे हिंगोली जिल्ह्यात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नवचैतन्य निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने