हिंगोली ग्रामीण पोलिसांचा कौतुकास्पद उपक्रम – ‘मी दक्ष’ रांगोळीद्वारे सायबर जनजागृती
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
20 ऑक्टोंबर
हिंगोली : दीपावलीच्या पार्श्वभूमीवर हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात आकर्षक सजावट, लाइटिंग आणि विशेष रांगोळ्यांनी सजलेले वातावरण पाहायला मिळाले. यामध्ये विशेष लक्षवेधी ठरली ती महिला पोलीस अधिकारी श्रीदेवी वघे यांनी साकारलेली ‘मी दक्ष’ ही सामाजिक संदेश देणारी रांगोळी.
ही रांगोळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. श्यामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली. या रांगोळीद्वारे श्रीदेवी वघे यांनी युवक-युवती तसेच नागरिकांना सायबर गुन्ह्यांपासून सतर्क राहण्याचा संदेश दिला. सायबर फसवणुकीतून स्वतःचे व कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी ‘मी दक्ष’ ही संकल्पना अत्यंत परिणामकारक ठरत आहे.
या उपक्रमाची चर्चा सध्या हिंगोली जिल्हाभरात जोरदार होत असून, नागरिक आणि पोलिस यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ झाले आहे. सतत २४ तास कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचारी वर्गाने समाजातील जनजागृतीसाठी अशा प्रकारची संकल्पना राबवणे हे निश्चितच प्रेरणादायी आहे.
पोलीस अधीक्षक श्री. कृष्णा कोकाटे यांच्या सर्वांगीण मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक श्री. श्यामकुमार डोंगरे व पोलीस निरीक्षक श्री. राहुल घुले यांच्या नेतृत्वात ‘मी दक्ष’ ही मोहीम गावागावात, वाड्या-तांड्यावर पोहोचली आहे. महिला पोलीस अधिकारी श्रीदेवी वघे यांनी सायबर सुरक्षा, ऑनलाईन फसवणूक टाळण्याचे उपाय, आणि नागरिकांनी दक्ष राहण्याचे महत्त्व याबाबत मौलिक मार्गदर्शन केले आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्याकडून ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचाऱ्यांना कौतुकाची थाप
या जनजागृती मोहिमेत हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी —
संतोष वाठोरे, सुधीर ढेबरे, असलम गारवे, प्रदीप राठोड, विजेश चव्हाण, बाळासाहेब खोडावे, वैजनाथ पवार, राजकुमार जमदाडे, नंदकिशोर जाधव, रहीम शेख, सातव, सत्यपाल लोणकर, कृष्णा पोले, जावळे, सुवर्णा पोले, ज्योती अन्नदाते व दीपा दिगे — यांनी उत्साहाने सहभाग नोंदवून महत्त्वाचे सहकार्य केले.
‘मी दक्ष’ या रांगोळीच्या माध्यमातून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याने दिलेला सामाजिक संदेश केवळ दृष्यदृष्ट्या सुंदरच नाही, तर समाजाच्या सायबर सुरक्षेबद्दल जागरूकता निर्माण करणारा आहे.
हा उपक्रम पोलिसांच्या जनसंपर्काचे आणि जबाबदार नागरिकत्वाचे उत्कृष्ट उदाहरण ठरला आहे.
टिप्पणी पोस्ट करा