सेनगाव पोलिस ठाण्यातर्फे उद्या मिनी दौड स्पर्धा — नागरिक, व्यापारी व पत्रकार बांधवांना सहभागाचे आवाहन

सेनगाव पोलिस ठाण्यातर्फे उद्या मिनी दौड स्पर्धा — नागरिक, व्यापारी व पत्रकार बांधवांना सहभागाचे आवाहन

, महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
, दि. 20 ऑक्टोबर

सेनगाव पोलिस ठाण्याच्या वतीने तसेच हिंगोली पोलिस दलाच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्मृती दिन आणि दीपावली उत्सव निमित्ताने मिनी दौड (धाव) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाद्वारे नागरिकांमध्ये आरोग्य, जागरूकता आणि एकात्मतेचा संदेश देण्याचा उद्देश आहे.

ही स्पर्धा मंगळवार, दिनांक 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजता सेनगाव पोलिस स्टेशन येथे प्रारंभ होणार असून, सेनगाव शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी वर्ग, पत्रकार बांधव, सोनार असोसिएशन, किराणा व मेडिकल असोसिएशन, वैद्यकीय अधिकारी तसेच कृषी केंद्रांचे प्रतिनिधी यांना सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

या स्पर्धेचा मार्ग पुढीलप्रमाणे असेल :


पोलिस स्टेशन → बस स्थानक → टी पॉईंट → तहसील टी पॉईंट → आजेगाव टी पॉईंट → नगर पंचायत → पुन्हा पोलिस स्टेशन

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या धावपटूंनी लोअर पॅन्ट आणि टी-शर्ट परिधान करून वेळेत पोलिस स्टेशन येथे उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही स्पर्धा ३५ वर्षांवरील नागरिकांसाठीच खुली आहे.

या उपक्रमाचे मार्गदर्शन व संयोजन सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. दीपक मस्के यांच्या नेतृत्वाखाली होत असून, हिंगोली पोलिस दल तसेच अमलदार वर्गाचा सक्रिय सहभाग राहणार आहे. या उपक्रमामागील प्रेरणा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनातून मिळाली आहे.

‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या पोलीस विभागाच्या ब्रीदवाक्याप्रमाणे या स्पर्धेद्वारे पोलिस आणि नागरिक यांच्यातील समन्वय, आरोग्यदायी जीवनशैली व सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला जाणार आहे.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने