मांडूळ सापाच्या तस्करीप्रकरणी अटकेत असलेल्या दोन आरोपींची जामीनावर सुटका!
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
7ऑक्टोबर 2025
हिंगोली जिल्ह्यातून मांडूळ साप (मांडूल) तस्करी प्रकरणात अटकेत असलेल्या दोन आरोपींचा जामीन मंजूर करण्यात आला असून, या प्रकरणात कायदेशीर लढाईत अनेक नामवंत विधिज्ञांनी सक्रिय सहभाग घेतल्याची माहिती पुढे आली आहे.
प्रकरणाची सविस्तर माहिती :
दिनांक 05 ऑक्टोबर 2025 रोजी, विलास भाकरे (रा. चोंढी, ता. सेनगाव, जि. हिंगोली) व काशिनाथ विश्वनाथ मोरे (रा. सोनखस, ता. वाशीम, जि. वाशीम) या दोघांविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर आरोपींनी एक जिवंत मांडूल साप पकडून त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात न सोडता, व वन अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती न देता स्वतःजवळ बाळगले, म्हणून त्यांच्यावर कलम 2(16)(अ), 9, 39, 50, 51 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला.
कायदेशीर प्रक्रिया :
दिनांक 06 ऑक्टोबर 2025 रोजी, प्रथम वर्ग न्यायालय, सेनगाव येथे आरोपींचा जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता.
या अर्जावर मा. एस.एस. जसस्वाल (प्रथम वर्ग न्यायाधीश, सेनगाव) यांच्यासमोर सुनावणी झाली. यामध्ये आरोपींच्या बाजूने प्रभावी युक्तिवाद करण्यात आला व न्यायालयाने दोन्ही आरोपींना जामीन मंजूर केला.
विधिज्ञांची महत्त्वाची भूमिका :
या प्रकरणात अॅड. अजय (बंटी) देशमुख यांनी मुख्य वकील म्हणून काम पाहिले. त्यांना खालील नामवंत वकील मंडळींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले
अॅड. सतीश देशमुख
अॅड. शामकांत देशमुख
अॅड. प्रदीप देशमुख
अॅड. शरद देशमुख
अॅड. अदित उर्फ शुभम देशमुख
अॅड. राहुल देशमुख
अॅड. योगेश खिल्लारी (पाटील)
अॅड. अविनाश राठोड
अॅड. रजत देशमुख
अॅड. प्रकाश मगरे
अॅड. आनंद खिल्लारे
अॅड. सुमित सातव
अॅड. मुदस्सीर अ. रहिम
अॅड. लखन पठाडे
अॅड. श्रद्धा जैस्वाल
अॅड. आकाश चव्हाण
अॅड. गजानन घुगे
अॅड. सुजित गायकवाड
अॅड. सुमित कदम
अॅड. तुषार पवार
अॅड. रुपाली खिल्लारे मॅडम
शेख आदिल शेख अजीस
अॅड. तुषार देशमुख
अॅड. सचिन सोनुने
वरील वकील टीमने सहकार्य केले
टिप्पणी पोस्ट करा