प्रभागांचे आरक्षण जाहीर; हिंगोलीत एक प्रभाग वाढला भावी नगरसेवक लागले कामाला

प्रभागांचे आरक्षण जाहीर; हिंगोलीत एक प्रभाग वाढला 
भावी नगरसेवक लागले कामाला

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
08 ऑक्टोबर 2025
हिंगोली : हिंगोली नगरपरिषदेच्या सन २०२५ मधील सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. ८ ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात सोडत प्रक्रिया पार पडली. यावर्षीच्या नवीन प्रभाग रचनेनुसार हिंगोलीत एक प्रभाग वाढला असून, त्यामुळे नगरसेवकांची संख्या देखील वाढणार आहे.
सोडत प्रक्रियेसाठी उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंढे, तसेच प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी दोन चिमुकल्यांच्या हस्ते सोडत प्रक्रिया पार पाडण्यात आली, ज्यामुळे वातावरणात उत्सुकता निर्माण झाली होती.

या आरक्षण प्रक्रियेत अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग (महिला) तसेच सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

जाहीर झालेले प्रभागनिहाय आरक्षण खालीलप्रमाणे:
प्रभाग क्र. १ अ. - अनुसूचित जाती (महिला) | १ ब. - सर्वसाधारण

प्रभाग क्र. २ अ. - अनुसूचित जाती (महिला) | २ ब. - सर्वसाधारण
प्रभाग क्र. ३ अ. - नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) | ३ ब. - सर्वसाधारण
प्रभाग क्र. ४ अ. - सर्वसाधारण (महिला) | ४ ब. - सर्वसाधारण
प्रभाग क्र. ५ अ. - अनुसूचित जाती (महिला) | ५ ब. - सर्वसाधारण
प्रभाग क्र. ६ अ. - नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) | ६ ब. - सर्वसाधारण
प्रभाग क्र. ७ अ. - नागरिकांचा मागास प्रवर्ग | ७ ब. - सर्वसाधारण (महिला)

प्रभाग क्र. ८ अ. - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) | ८ ब. - सर्वसाधारण
प्रभाग क्र. ९ अ. - सर्वसाधारण (महिला) | ९ ब. - सर्वसाधारण
प्रभाग क्र. १० अ. - नागरिकांचा मागास प्रवर्ग | १० ब. - सर्वसाधारण (महिला)

प्रभाग क्र. ११ अ. - अनुसूचित जाती | ११ ब. - सर्वसाधारण (महिला)
प्रभाग क्र. १२ अ. - नागरिकांचा मागास प्रवर्ग | १२ ब. - सर्वसाधारण (महिला)

प्रभाग क्र. १३ अ. - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) | १३ ब. - सर्वसाधारण
प्रभाग क्र. १४ अ. - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) | १४ ब. - सर्वसाधारण
प्रभाग क्र. १५ अ. - अनुसूचित जाती | १५ ब. - सर्वसाधारण (महिला)
प्रभाग क्र. १६ अ. - अनुसूचित जमाती (महिला) | १६ ब. - सर्वसाधारण

प्रभाग क्र. १७ अ. - नागरिकांचा मागास प्रवर्ग | १७ ब. - सर्वसाधारण (महिला)

या आरक्षण घोषणेनंतर भावी नगरसेवक आणि राजकीय इच्छुकांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे.
पक्षांच्या बैठका, मतदारसंघांतील संपर्क, आणि संघटनात्मक हालचालींना आता गती मिळत आहे.

या सोडत प्रक्रियेस नगर अभियंता प्रतीक नाईक, उपमुख्याधिकारी शाम माळवटकर, प्रकाश साबळे, सचिन पवार, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, संगणक अभियंता रामेश्वर चाटे, गोविंद चव्हाण, पंडीत मस्के, अथर्व वर्मा, शेख सादिक, देविसिंग ठाकुर, प्रशांत बोरसे आदी अधिकारी उपस्थित होते.

हिंगोली नगरपरिषदेच्या निवडणुकीत आता नवीन प्रभाग रचना आणि आरक्षणामुळे राजकीय रंगत आणखी वाढणार असून, हिंगोलीतील मतदार आणि इच्छुक उमेदवार यांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने