बासंबा गण हिंगोली पंचायत समितीसाठी सुरेंद्र ढाले निवडणूक लढवणार

बासंबा   गण हिंगोली पंचायत समितीसाठी सुरेंद्र ढाले निवडणूक लढवणार

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
03 नोव्हेंबर
हिंगोली : बासबा गावचे लोकप्रिय आणि जनतेच्या मनात आपले स्थान निर्माण केलेले नेते सुरेंद्र ढाले यांनी आगामी हिंगोली पंचायत समिती निवडणुकीत बासंबा गणातून उमेदवारी दाखल करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
गेल्या वीस वर्षांपासून सक्रिय राजकारणात कार्यरत असलेले सुरेंद्र ढाले यांनी स्थानिक पातळीवर ठाम नेतृत्व निर्माण केले आहे.

 बासंबा येथील सरपंच पदाची जबाबदारी त्यांनी सलग पाच वर्षे यशस्वीपणे पार पाडली असून त्यांच्या कार्यकाळात गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना राबवल्या. ग्रामपंचायत इमारतीचे नूतनीकरण, रस्ते काँक्रीटीकरण, पाणीपुरवठा योजना, शैक्षणिक सुविधा आणि सामाजिक उपक्रम या सर्व क्षेत्रांत त्यांनी भरीव कामगिरी केली.
गावाच्या विकासाचा नवा अध्याय लिहिणारे नेते म्हणून आज सुरेंद्र ढाले यांना “विकासपुरुष” म्हणून ओळख मिळाली आहे.
सध्या कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली सुरेंद्र ढाले राजकारणात सक्रिय आहेत. आमदार बांगर यांच्या विकासाभिमुख आणि जनसंपर्कप्रधान कार्यपद्धतीचा प्रभाव ढाले यांच्या कामकाजावर स्पष्टपणे दिसून येतो.
आमदार संतोष बांगर यांच्या खांद्याला खांदा लावून ते कार्यरत आहेत, आणि परिसरातील विविध विकासकामांमध्ये ते सतत आघाडीवर असतात.

“पक्षाने संधी दिल्यास मी नागरिकांच्या भल्यासाठी, विकासासाठी आणि जनतेच्या विश्वासासाठी पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या मैदानात उतरेन,” असे सुरेंद्र ढाले यांनी सांगितले.
त्यांनी पुढे म्हटले की, “गाव आणि गणाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. प्रत्येक नागरिकाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी माझे प्रयत्न सतत सुरू राहतील.”

सध्या निवडणुकीचे वारे लागले असून, ग्रामपातळीपासून जिल्ह्यापर्यंत राजकीय हालचालींना वेग आला आहे.
बासबा गणामध्ये सुरेंद्र ढाले यांच्या उमेदवारीची चर्चा जोरदार सुरू असून, तरुण, शेतकरी, महिला आणि वयोवृद्ध नागरिकांकडून त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.
त्यामुळे या गणातील निवडणूक चुरशीची आणि विकासाच्या मुद्यावर आधारित होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

सुरेंद्र ढाले यांच्या प्रामाणिक नेतृत्वामुळे बासुंबा गणाचा विकास नवा उंचाव गाठेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने