भ्रष्टाचार प्रकरणात माजी गट विकास अधिकारी खिल्लारी सह पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल


भ्रष्टाचार प्रकरणात माजी गट विकास अधिकारी  खिल्लारी सह पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
31 ऑक्टोंबर 
दि. 27 ऑक्टोबर 2025:
हिंगोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Bureau - ACB) कळमनुरी पंचायत समितीचे तत्कालीन गट विकास अधिकारी मनोहर लक्ष्मण खिल्लारी (वय 60) व त्यांची पत्नी सौ. रेखा मनोहर खिल्लारी (वय 58) यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी गु.र.नं. 804/2025 अन्वये हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विकास घनवट (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, हिंगोली) हे करीत आहेत.

प्रकरणाचा तपशील :
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक राजेश मलपिनु यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी मनोहर खिल्लारी यांनी त्यांच्या सेवाकालात व त्यांची पत्नी रेखा खिल्लारी यांनी 01 जानेवारी 2005 ते 15 मार्च 2022 या कालावधीत एकत्रितपणे त्यांच्या वैध उत्पन्नापेक्षा ₹44,05,775 इतकी अधिकची संपत्ती (अपसंपदा) बाळगल्याचे निष्पन्न झाले आहे.

सदर कालावधीत दोघांचे एकूण वैध उत्पन्न ₹1,43,09,746, तर एकूण खर्च व मालमत्ता मिळून ₹1,87,15,521 इतकी असल्याचे तपासात आढळले. त्यामुळे त्यांच्या संपत्तीचे प्रमाण वैध उत्पन्नापेक्षा 30.78 टक्क्यांनी जास्त असल्याचे निदर्शनास आले.
लावलेले कलम :
या प्रकरणात आरोपींवर
भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 13(1)(a), 13(2), तसेच
भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम (सुधारणा कायदा 2018) चे कलम 13(1)(b) सह 13(2), आणि

भारतीय दंड संहिता (IPC) चे कलम 109 (गुन्ह्यास प्रोत्साहन देणे)
अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्नी रेखा खिल्लारी यांनी पती मनोहर खिल्लारी यांनी प्राप्त केलेली अपसंपदा स्वतःच्या नावावर ठेवून गुन्ह्यास सहकार्य केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने