हिंगोली जिल्हाधिकारी मा. राहुल गुप्ता यांचा उत्कृष्ट कामगिरी व वाढदिवसानिमित्त सत्कार
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
30 ऑक्टोबर
हिंगोली : जिल्ह्यातील प्रशासनिक कामकाजात पारदर्शकता, जनसंपर्क आणि विकासाभिमुख कार्यशैली यामुळे जिल्हाधिकारी मा. राहुल गुप्ता यांनी अल्पावधीतच जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या उत्कृष्ट शासनकारभारासह वाढदिवसानिमित्त आज विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी, पत्रकार व नागरिकांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयात आणि विविध शासकीय विभागांमध्ये शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्यांची गर्दी पाहायला मिळाली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते ज्येष्ठ पत्रकार सुधाकर वाढवे, पत्रकार गोपाळ सरनाईक आरोग्य विभागाचे प्रसिद्धीप्रमुख मारोतराव पोले यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्री. गुप्ता यांना पुष्पगुच्छ व अभिनंदन पत्र देत गौरव केला.
जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या विविध योजनांमध्ये, विशेषतः कुष्ठरोग निर्मूलन मोहिमेत हिंगोली जिल्ह्याने राज्यात आदर्श निर्माण केला असून, या यशामागे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाचा मोठा वाटा असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
तसेच, जिल्ह्यातील शासन योजना प्रभावीपणे राबविणे, नागरिकांशी थेट संवाद साधून समस्या निवारण करणे, तसेच डिजिटल प्रशासनाला चालना देणे या क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक करण्यात आले.
या प्रसंगी विविध शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, तसेच माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी गुप्ता यांनी सर्वांचे आभार मानत सांगितले की, “हिंगोलीच्या सर्व नागरिकांचा आणि शासकीय कर्मचाऱ्यांचा सहकार्यभाव हा माझ्या कार्याची खरी प्रेरणा आहे. प्रशासन हे लोकांसाठी आहे, आणि लोकांच्या विकासासाठी आम्ही सर्वांनी एकत्र काम करत राहिले पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा