भ्रष्टाचार निर्मूलनासाठी जनजागृतीचा निर्धार — हिंगोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे ‘दक्षता जनजागृती सप्ताह २०२५’ उत्साहात सुरू

भ्रष्टाचार निर्मूलनासाठी जनजागृतीचा निर्धार — हिंगोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे ‘दक्षता जनजागृती सप्ताह २०२५’ उत्साहात सुरू

हिंगोली, दि. २९ ऑक्टोबर 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, हिंगोली यांच्या वतीने दिनांक २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ‘दक्षता जनजागृती सप्ताह – २०२५’ उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाचे औचित्य साधून विभागामार्फत भ्रष्टाचार निर्मूलन व पारदर्शक शासनप्रणाली याबाबत जिल्ह्यातील नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती केली जात आहे.

या जनजागृती सप्ताहादरम्यान तालुकानिहाय शहरी तसेच ग्रामीण भागांमध्ये अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष भेट देऊन भ्रष्टाचारविरोधी जनजागृती कार्यक्रम, व्याख्याने, चर्चासत्रे, वादविवाद स्पर्धा, निबंध स्पर्धा व कार्यशाळा आयोजित करत आहेत. नागरिकांना भ्रष्टाचाराविरोधात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.

या अभियानांतर्गत भ्रष्टाचार निर्मूलनाचे घोषवाक्य असलेली पत्रके, पॅम्पलेट्स, भिंतीपत्रके आणि बॅनर्स जिल्हाभर वितरीत करण्यात आले आहेत. तसेच, तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया नागरिकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचविण्यात येत आहे.

दक्षता जनजागृती सप्ताह २०२५ राबविताना महाराष्ट्र शासनाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्वांचे व अटींचे काटेकोर पालन करण्यात येत आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे भ्रष्टाचारमुक्त प्रशासन व प्रामाणिकतेची संस्कृती निर्माण करणे हा आहे.

तक्रारी नोंदविण्यासाठी संपर्क:

  • मा. श्री संदीप पालवे, पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड — मोबाईल क्रमांक: ९५४५५३१२३४ / ९२२६४८४६९९
  • श्री विकास घनवट, पोलीस उपअधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, हिंगोली — मोबाईल क्रमांक: ९८२२२५९९३२
  • टोल फ्री क्रमांक: १०६४
  • लॅन्डलाईन: ०२४५६-२२३०५५
  • व्हॉट्सअॅप क्रमांक: ९३५९१२८८८९ / ९४२२०६१०६४

"भ्रष्टाचारमुक्त भारत — प्रामाणिकतेचा संकल्प, प्रत्येक नागरिकाचा सहभाग!"

(विकास घनवट)
पोलीस उपअधिक्षक, अँटी करप्शन ब्युरो, हिंगोली



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने