संचालिका गीताबाई जगताप यांना अटकपूर्व जामीन मंजूरॲड. जी. के. गायकवाड पाटील


संचालिका गीताबाई जगताप यांना अटकपूर्व जामीन मंजूर
ॲड. जी. के. गायकवाड पाटील

 महाराष्ट्र 24न्यूज नेटवर्क 
13 नोव्हेंबर 
न्यू हिंगोली अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मर्या., हिंगोली येथील तब्बल ₹12,15,00,596 (बारा कोटी पंधरा लाख पाचशे शहाण्णव रुपये) अपहार तसेच ₹66,34,290 (सहाष्ट लाख चौतीस हजार दोनशे नवद रुपये) आर्थिक नुकसान प्रकरणी आरोपी संचालिका गीताबाई विठ्ठल जगताप यांना विद्यमान जिल्हा व सत्र न्यायालय, हिंगोली यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
प्रकरणाचा तपशील :
फिर्यादी यांनी 31/12/2019 ते 30/11/2024 या कालावधीत सोसायटीतील व्यवहारांची तपासणी करून अहवाल सादर केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, न्यू हिंगोली अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., हिंगोली येथील संचालक, पासिंग ऑफिसर, रोखपाल, व्यवस्थापक तसेच इतर संबंधित कर्मचारी यांच्याविरुद्ध एकूण 12 कोटी 15 लाख 5शे 96 रुपये अपहार आणि 66 लाख 34 हजार 290 रुपये आर्थिक नुकसान केल्याबाबत पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे दिनांक 19/08/2025 रोजी गुन्हा क्रमांक 641/2025 नोंदविण्यात आला.

या गुन्ह्यात कलम 120(बी), 408, 409, 420, 465, 467, 468, 471 भा.दं.वि. तसेच सहकलम 3 आणि 4 महाराष्ट्र संरक्षण गुंतवणूकदार हित अधिनियम (एम.पी.आय.डी. अ‍ॅक्ट) 1999 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अटकपूर्व जामीन अर्ज व निकाल :
आरोपी संचालिका गीताबाई विठ्ठल जगताप यांनी दिनांक 2/09/2025 रोजी विद्यमान जिल्हा व सत्र न्यायालय, हिंगोली येथे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.

या प्रकरणातील दोन्ही बाजूंचे सविस्तर युक्तिवाद ऐकल्यानंतर, दिनांक 13/11/2025 रोजी विद्यमान जिल्हा व सत्र न्यायाधीश माने मॅडम, हिंगोली यांनी गीताबाई जगताप यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.

न्यायालयातील युक्तिवाद :
आरोपीच्या वतीने ॲड. जी. के. गायकवाड पाटील यांनी प्रभावी युक्तिवाद केला.
त्यांना ॲड. ओम पतंगे, ॲड. एस. एस. सातव आणि ॲड. रवी कडतीकर यांनी सहकार्य केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने