हिंगोलीत साई रिसॉर्ट व न्यू बंजारा हॉटेलमध्ये तरुणीवर बलात्कार आरोपीला तीन दिवसाची पोलीस कोठडी
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
7 नोव्हेंबर 2025
हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध अनुसूचित जातीच्या तरुणीची फसवणूक, शारीरिक अत्याचार, मारहाण व जातीवरून छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा धक्कादायक प्रकार साई रिसॉर्ट व न्यू बंजारा हॉटेल, हिंगोली येथे घडल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी ही अनुसूचित जातीतील असून आरोपी सचिन शिवाजी घोंगडे (वय 25 वर्ष, जात - मराठा, रा. पहेनी ता. हिंगोली, जि. हिंगोली) याने फिर्यादीस लग्नाचे आश्वासन देत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर फिर्यादीने आरोपीच्या घरच्यांविरुद्ध दाखल केलेली तक्रार मागे न घेतल्याने आरोपीने तिच्यावर संताप व्यक्त केला.
दिनांक 28 ऑगस्ट 2023 पासून ते 6 नोव्हेंबर 2025 दरम्यान सकाळी 10 वाजता ते दुपारी 12 वाजेपर्यंत साई रिसॉर्ट व न्यू बंजारा हॉटेल, हिंगोली येथे आरोपीने फिर्यादीस मारहाण केली, थपडा-बुक्यांनी मारहाण करून तिला कोंडून ठेवले, अशी फिर्याद पीडितेने हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.
या प्रकरणी पोलीसांनी गु.र.नं. 622/2025 अंतर्गत कलम 69, 115(2), 127(2) भा.दं.वि., तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा कलम 3(1)(w), 3(2)(v-a) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीला हिंगोली न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
गु न्हा दि. 06 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 11.38 वा. दाखल करण्यात आला असून, गुन्ह्याचा तपास राजकुमार केंद्रे, उपविभागीय पोलिस अधिकारी, हिंगोली ग्रामीण हे करीत आहेत.
तपासामध्ये पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे श्रीदेवी वघे
यांचा समावेश आहे
टिप्पणी पोस्ट करा