वाळू चोरी प्रकरणात निर्दोष मुक्तता — प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी भंडारी मॅडम यांचा निर्णय

 वाळू चोरी प्रकरणात निर्दोष मुक्तता — प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी भंडारी मॅडम यांचा निर्णय 


हिंगोली

07नोव्हेंबर 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क

 हिंगोली जिल्ह्यातील चर्चेतील वाळू चोरी प्रकरणात आज न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत आरोपी रामेश्वर चंदू पाखरे व चंदू यशवंत पाखरे (दोघेही रा. पिंपळखुटा, ता. व जि. हिंगोली) यांना निर्दोष मुक्त केले आहे.

या प्रकरणात पिंपळखुटा नदीच्या पात्रातून वाळू चोरी केल्याचा आरोप होता. दिनांक 08 ऑगस्ट 2021 रोजी पिंपळखुटा येथील नदीपात्रातून वाळू चोरी केल्याबाबत पोलिस स्टेशन बासंबा येथे फिर्यादीने तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक 145/2020 अंतर्गत कलम 379 भा.दं.वि. तसेच सहकलम 48(7)(8) गौण खनिज अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता.

सदर प्रकरणाचा तपास पूर्ण करून संबंधित तपासी अधिकाऱ्यांनी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालय, हिंगोली येथे दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर प्रकरणाची RCC क्रमांक 17/2021, सरकार विरुद्ध रामेश्वर व इतर अशी नोंदणी करण्यात आली.

सरकारी पक्षाने या प्रकरणात एकूण पाच साक्षीदारांचे जबाब नोंदविले. सर्व साक्षी व युक्तिवाद ऐकल्यानंतर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी भंडारी मॅडम यांनी सबळ पुरावे नसल्यामुळे दिनांक 03 नोव्हेंबर 2025 रोजी आरोपींना निर्दोष मुक्त करण्याचा आदेश दिला.

या प्रकरणात आरोपींच्या वतीने अॅड. जी. के. गायकवाड पाटील यांनी प्रभावीपणे युक्तिवाद केला, तर अॅड. ओम पतंगे, अॅड. एस. एस. सातव आणि अॅड. रवी कुमार जाधव यांनी सहकार्य केले.

या निर्णयामुळे परिसरात विविध स्तरांवर चर्चेला उधाण आले असून, न्यायालयाने दिलेला हा निर्णय कायद्याच्या अंमलबजावणीसाठी एक महत्त्वपूर्ण दाखला ठरला आहे.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने