हिंगोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५चा कार्यक्रम जाहीर(प्रत्यक्ष निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात – नगराध्यक्षपद मागास प्रवर्ग (महिला) करिता आरक्षित)

हिंगोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५चा कार्यक्रम जाहीर
(प्रत्यक्ष निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात – नगराध्यक्षपद मागास प्रवर्ग (महिला) करिता आरक्षित)

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
05 नोव्हेंबर 
हिंगोली : मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या पत्र क्र. रानिआ-२०२५/निका/नप/प्र.क्र.१४/का-६ दिनांक ०४ नोव्हेंबर २०२५ नुसार हिंगोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीत हिंगोली नगर परिषदेकरिता १ अध्यक्ष थेट निवड पद्धतीने व एकूण ३४ सदस्यांची निवड होणार आहे.


१. अध्यक्ष पदाचे आरक्षण
नगर विकास विभागाच्या आदेश क्र. एमसीओ-२०२५/प्र.क्र.४०९/नवी-१४ दिनांक ०६ ऑक्टोबर २०२५ नुसार हिंगोली नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद ‘नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)’ या वर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या वेळी नगराध्यक्षपदासाठी मागास प्रवर्गातील महिला उमेदवार थेट निवडणुकीद्वारे निवडल्या जाणार आहेत.


२. प्रभाग व सदस्य संख्या
२०११ च्या जनगणनेनुसार हिंगोली नगर परिषदेची लोकसंख्या ८५,१०३ आहे. यानुसार नगर परिषद क्षेत्रात १७ द्विसदस्यीय प्रभाग निश्चित करण्यात आले असून, त्यातून एकूण ३४ सदस्यांची निवड केली जाणार आहे.
आरक्षणाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे:
अनुसूचित जाती (SC) : ५
अनुसूचित जमाती (ST) : १
नागरिकांचा मागासवर्ग (OBC) : ९
अराखीव (सर्वसाधारण) : १९

दि. ०८ ऑक्टोबर २०२५ रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली असून महिलांसाठी राखीव जागा पुढीलप्रमाणे आहेत:
अनुसूचित जाती (महिला) – ३
अनुसूचित जमाती (महिला) – १
नागरिकांचा मागासवर्ग (महिला) – ५
अराखीव (महिला) – ८
३. मतदार संख्या
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार दि. ०१ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेली महाराष्ट्र विधानसभेची मतदार यादी वापरून प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्यात आली आहे.
अंतिम मतदार यादी दि. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रकाशित करण्यात आली असून हिंगोली नगर परिषद क्षेत्रातील एकूण मतदारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे:

एकूण मतदार – ७१,८८०
पुरुष – ३६,६९६
महिला – ३५,१८४
इतर – —
४. मतदान केंद्रे

या निवडणुकीसाठी एकूण १७ प्रभागांकरिता ७८ मतदान केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत. मतदान केंद्रनिहाय मतदार यादी दि. ०७ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
५. प्रशासनाची तयारी
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततेत आणि सुयोग्य रीतीने पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी तयारी सुरू आहे. निवडणूक निर्णय अधिकारी श्री. समाधान घुटूकडे यांनी माहिती देताना सांगितले की, सर्व प्रभागांत मतदान केंद्रांची पाहणी पूर्ण झाली असून आवश्यक सुविधा सुनिश्चित करण्यात आल्या आहेत.

 हिंगोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५
(समाधान घुटूकडे)
निवडणूक निर्णय अधिकारी, हिंगोली नगर परिषद

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने