कोपरवाडी जंगलातील खुनाचा गुन्हेगूढ उकललेस्थानीय गुन्हे शाखा हिंगोलीची संयुक्त कारवाई



कोपरवाडी जंगलातील खुनाचे गुन्हेगूढ उकलले

स्थानीय गुन्हे शाखा हिंगोलीची संयुक्त कारवाई

हिंगोली, दि. ६ डिसेंबर 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 

 पोलीस स्टेशन आखाडा बाळापुर हद्दीतील कोपरवाडी परिसरात १ डिसेंबर रोजी जंगलाजवळील नाल्यात हात बांधलेल्या अवस्थेत एक अनोळखी मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. ही घटना समोर आल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकृष्ण कोकाटे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजकुमार केंद्रे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक पाहणीत ही घटना खुनाची असल्याचा संशय बळावला. त्यानुसार मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी तसेच गुन्हा उघड करण्यासाठी स्थानीय गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. मोहन भोसलेपोस्टे बाळापुरचे पोनि श्री. विष्णुकांत गुठ्ठे यांना आवश्यक दिशा–निर्देश देण्यात आले.

मृतदेहाची ओळख पटली

पोलिसांनी केलेल्या तपासानुसार मृतदेह हा पंजाबराव राघोजी मोरे (वय ५८), रा. हनुमाननगर, ता. बाळापुर यांचा असल्याचे निष्पन्न झाले. खून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केल्याचे लक्षात येत असून घटनास्थळी कोणताही ठोस पुरावा प्रथमदर्शनी आढळून आला नव्हता.

विशेष पथकाची चौकशी

एसपी यांच्या सूचनेनुसार सपोनि श्री. शिवसांब घेवारे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली, परिसरातील अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली.

या तपासातून पोलिसांच्या माहितीनुसार, मृत व्यक्तीच्या ओळखीतील दोन व्यक्ती संशयित म्हणून समोर आले. त्यात —

  • सुदर्शन श्रीहरी फड (वय ३५), व्यवसाय: बेकरी चालक, रा. शिक्षक कॉलनी, बाळापुर
  • जियाउल्लाखान खाजाखान (वय ३३), व्यवसाय: बेकरी कामगार, रा. शेवाळा रोड, टिपू सुलतान चौक, बाळापुर

या दोघांवर आर्थिक देवाण-घेवाणीतील वादातून खून केल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यानुसार दोन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली असून पुढील तपास सुरू आहे.

कारवाईत सहभागी पथक

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकृष्ण कोकाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजकुमार केंद्रे, स्थानीय गुन्हे शाखेचे पोनि श्री. मोहन भोसले, पोस्टे बाळापुरचे पोनि विष्णुकांत गुठ्ठे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाईमध्ये सपोनि शिवसांब घेवारे, पोउपनि गणेश गोटके, तसेच पोलीस कर्मचारी भुजंग कोकरे, गजानन पोकळे, साईनाथ कंटे, नरेंद्र साळवे, आकाश टापरे, शिवाजी जालमिरे, हदिभाऊ गुंजकर, ज्ञानेश्वर गोरे, शिवाजी पवार, दत्ता नागरे, प्रदीप झुंगरे, मारोती काकडे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने