हिंगोलीला मिळतोय ‘दबंग’ अधिकारी!कुंदन कुमार वाघमारे उद्या घेणार उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याचा कार्यभार

हिंगोलीला मिळतोय ‘दबंग’ अधिकारी!
कुंदन कुमार वाघमारे उद्या घेणार उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याचा कार्यभार
महाराष्ट्र24 न्यूज नेटवर्क 
७ डिसेंबर 2025
हिंगोली शहरात गुन्हेगारीवर गडद छाप टाकणारे, निर्भय आणि कर्तव्यनिष्ठ म्हणून ओळखले जाणारे कुंदन कुमार वाघमारे उद्या, दिनांक ८ डिसेंबर, हिंगोली शहर उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. महाराष्ट्र २४ न्यूज नेटवर्क चे विशेष वृत्त.

यापूर्वी त्यांनी औंढा नागनाथ, सेनगाव, वसमत, हिंगोली शहर वाहतूक शाखा या महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस निरीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळताना गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यांच्या कडक आणि परिणामकारक शैलीमुळे जिल्ह्यात ते ‘दबंग अधिकारी’ म्हणून ओळखले जातात.

नुकतीच त्यांची छत्रपती संभाजीनगर येथून बदली होऊन हिंगोलीत नियुक्ती झाली आहे. ८ डिसेंबर रोजी ते औपचारिकरित्या रुजू होणार असून त्यांच्या अखत्यारीत आता कळमनुरी पोलीस स्टेशन, हिंगोली शहर पोलीस स्टेशन आणि बासंबा पोलीस स्टेशन यांचा समावेश राहणार आहे.
हिंगोलीत कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी त्यांच्या येण्याची चर्चा सर्वत्र असून नागरिकांमध्येही समाधानाचं वातावरण आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने