लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पीटलच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त भव्य आरोग्य शिबीर

लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पीटलच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त भव्य आरोग्य शिबीर

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
24 डिसेंबर 2025
हिंगोली : शहरातील नारायण नगर परिसरातील लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पीटलच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त नागरिकांच्या आरोग्यासाठी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन १ ते १० जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे. या आरोग्य शिबिरासाठी पूर्व नावनोंदणी आवश्यक असल्याची माहिती हॉस्पीटल प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
या शिबिरात हृदयरोग तपासणी व उपचारांवर विशेष भर देण्यात आला आहे. अॅन्जिओग्राफी, हृदयाची सोनोग्राफी, ईसीजी व हृदयरोग संबंधी रक्त तपासणी असा ११ हजार रुपयांचा तपासणी पॅकेज फक्त ३ हजार रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच ट्रेडमिल टेस्ट, हृदयाची सोनोग्राफी, ईसीजी व रक्त तपासणी असा ८ हजार रुपयांचा पॅकेज केवळ २ हजार रुपयांत करण्यात येणार आहे.
याशिवाय सीबीसी, ब्लड शुगर लेव्हल (एफबीएस व पीपीबीएस), ईसीजी, युरिक अॅसिड, थायरॉईड व एक्स-रे चेस्ट या सर्व तपासण्या फक्त १ हजार रुपयांत करण्यात येणार आहेत. अॅपेंडिक्स व हर्नियाच्या शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात, तर मुतखडा व प्रोस्टेटच्या सर्व शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. तसेच मोफत अॅन्जिओप्लास्टीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
मोतीबिंदू शस्त्रक्रिया केवळ ४,९९९ रुपयांत, तर एंडोस्कोपी (पोट व आतड्यांची दुर्बिणीद्वारे तपासणी) फक्त ३ हजार रुपयांत करण्यात येणार आहे.
लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पीटलची वैशिष्ट्ये :
हे ५० बेडचे मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पीटल असून येथे मेडिसीन, ऑर्थोपेडिक, युरोलॉजी, सर्जरी, ट्रॉमा केअर सेंटर, डायलेसिस विभाग, तसेच सुसज्ज अतिदक्षता विभाग (ICU), कॅथलॅब उपलब्ध आहे. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मोफत उपचार, तसेच स्टार हेल्थ व आयसीआयसीआय कॅशलेस उपचार सुविधा येथे उपलब्ध आहेत.
या भव्य आरोग्य शिबिराचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पीटलच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी माधव सपाटे, श्रीराम मगर व राम मुटकुळे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने