हिंगोली महिला अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीतील 30.78 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात चार आरोपींना अटकपूर्व जामीन
महाराष्ट्र 24 न्यूज नेटव
25 डिसेंबर 2025
हिंगोली महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडमध्ये सुमारे 30 कोटी 78 लाख रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अडकलेल्या कॅशिअर व इतर पदाधिकाऱ्यांना जिल्हा व सत्र न्यायालय, हिंगोली यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या निर्णयामुळे सदर प्रकरणात मोठी न्यायालयीन घडामोड घडली आहे.
या प्रकरणात फिर्यादी अर्पित कमलकिशोर बगडिया यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 156(3) अन्वये न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सदर अर्ज मंजूर झाल्यानंतर हिंगोली शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 640/2021 अन्वये भादंवि कलम 420, 408, 409, 465, 467, 468, 471, 120(ब) तसेच MPID कायदा कलम 3 व 4 अंतर्गत 19 ऑगस्ट 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, 01 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2024 या कालावधीत संस्थेच्या संचालक मंडळातील सदस्य, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमताने ठेवीदारांची फसवणूक करत एकूण 30,78,96,676 रुपयांची अफरातफर केली असून त्यापैकी 4,43,91,675 रुपयांचा प्रत्यक्ष अपहार केल्याचा गंभीर आरोप आहे.
या गुन्ह्यातील आरोपी
दिव्या दुर्गादास खर्जुले,
ज्योती गणेश गंगावणे,
मोनाली बजरंग अंबेकर,
अजिंक्य अंबादास खर्जुले उर्फ जगन्नाथ खर्जुले,
यांनी जिल्हा व सत्र न्यायालय, हिंगोली येथे ॲड. अजय (बंटी) पंडीतराव देशमुख यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
दि. 09 डिसेंबर 2025 रोजी या अर्जावर सुनावणी झाली. यावेळी मा. सत्र न्यायाधीश श्री. विश्वास एस. माने यांनी दोन्ही पक्षांचे सविस्तर युक्तिवाद ऐकून चारही आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केला.
आरोपींच्या वतीने ॲड. सतिष देशमुख, ॲड. शामकांत देशमुख व ॲड. प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. अजय (बंटी) पंडीतराव देशमुख यांनी प्रभावी युक्तिवाद सादर केला. त्यांना ॲड. शरद देशमुख, ॲड. अदित ऊर्फ शुभम देशमुख, ॲड. राहुल देशमुख, ॲड. योगेश खिल्लारी (पाटील), ॲड. अविनाश राठोड, ॲड. रजत देशमुख, ॲड. प्रकाश मगरे, ॲड. आनंद खिल्लारे, ॲड. सुमित सातव, ॲड. मुदस्सीर अब्दुल रहिम, ॲड. लखन पठाडे, ॲड. श्रद्धा जैस्वाल, ॲड. आकाश चव्हाण, ॲड. शुभम मुदिराज, ॲड. गजानन घुगे, ॲड. सुजित गायकवाड, ॲड. सुमित कदम, ॲड. विराज देशमुख, ॲड. तुषार पवार, ॲड. रुपाली खिल्लारे, ॲड. आदिल शेख अजीस, ॲड. शिवम देशमुख, ॲड. संदीप डवले, ॲड. तुषार देशमुख, ॲड. सचिन सोनुने आदी वकिलांनी सहकार्य केले
टिप्पणी पोस्ट करा