लाच मागणी प्रकरणातील लिपिक आरोपीस जामीन मंजूरअँड अजय उर्फ बंटी देशमुख

लाच मागणी प्रकरणातील लिपिक आरोपीस जामीन मंजूर
अँड अजय उर्फ बंटी देशमुख 

 महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
15 जानेवारी 2026 
कळमनुरी पोलीस ठाण्यात दाखल लाच मागणी प्रकरणातील लिपिक आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे. गुन्हा क्र. 09/2026 अन्वये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 च्या कलम 7 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात दिनांक 08 जानेवारी 2026 रोजी तक्रारदाराने पोलीस ठाणे कळमनुरी येथे तक्रार दाखल केली होती. तक्रारदार व त्याच्या भावाचे नाव बीपीएल (दारिद्र्यरेषेखालील) योजनेअंतर्गत अन्नधान्य लाभासाठी समाविष्ट करून घेण्यासाठी तसेच अन्नधान्य योजनेचा अंतिम आदेशाची प्रत देण्यासाठी प्रत्येकी 1,500 रुपये, असे एकूण 3,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप संबंधित लिपिकावर करण्यात आला होता.
सदर तक्रारीच्या आधारे आरोपी चक्रधर पंडितराव कदम यांना 3,000 रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. अटकेनंतर आरोपीने ॲड. अजय (बंटी) पंडितराव देशमुख यांच्या मार्फत जिल्हा व सत्र न्यायालय, हिंगोली येथे नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
या जामीन अर्जावर माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. एन. माने यांनी दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी दोन्ही पक्षांचा सविस्तर युक्तिवाद ऐकून आरोपीस नियमित जामीन मंजूर केला.
आरोपीच्या वतीने ॲड. सतिष देशमुख, ॲड. शामकांत देशमुख व ॲड. प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. अजय (बंटी) पंडितराव देशमुख यांनी प्रभावी युक्तिवाद केला. या वेळी ॲड. शरद देशमुख, ॲड. अदित उर्फ शुभम देशमुख, ॲड. राहुल देशमुख, ॲड. योगेश खिल्लारे (पाटील), ॲड. अविनाश राठोड, ॲड. रजत देशमुख, ॲड. प्रकाश मगरे, ॲड. मुदस्सीर अ. रहिम, ॲड. आनंद खिल्लारे, ॲड. सुमित सातव, ॲड. लखन पठाडे, ॲड. श्रद्धा जैस्वाल, ॲड. आकाश चव्हाण, ॲड. गजानन घुगे, ॲड. सुजित गायकवाड, ॲड. सुमित कदम, ॲड. तुषार देशमुख, रुपाली खिल्लारे, शेख आदिल शेख अजीस, ॲड. तुषार पवार, ॲड. सचिन सोनुने, ॲड. संदीप डवले तसेच ॲड. प्रिया कुरील यांनी सहकार्य केले.

Post a Comment

أحدث أقدم