शीर्षक नाही

प्रति,
मा. संपादक साहेब,
दैनिक…………………
हिंगोली.
विषय:- खालील बातमी आपल्या माहितीस्व ..
 *लाच मागणी प्रकरणातील लिपिक आरोपीची जामीन मंजुर* 
प्रकरणाची थोडक्यात हकीकत,
दिनांक 08/01/2026 रोजी पोलीस स्टेशन कळमनुरी येथे गुन्हा क्र. 09/2026
कलम 7,  भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.
        तक्रारदाराने  त्याचे व त्याच्या भावाचे बी पी एल योजने अंतर्गत अन्न धान्याचा लाभ मिळण्याच्या योजने मध्ये नाव समाविष्ट करून अन्न धान्याचा योजनेचा लाभ मिळण्याची अंतीम आदेशाची प्रत काढुन देण्यासाठी प्रत्येकी 1500 रु असे एकुण 3000 रुपयाची मागणी केल्याच्या आरोपावरून तक्रार दिली होती.
    तरी सदर प्रकरणामधे आरोपी ,  चक्रधर पंडीतराव कदम यांना रक्कम 3000/ रुपयाची लाच घेतल्याच्या  आरोपावरून  अटक झाली होती. 
     प्रस्तुत प्रकरणामध्ये आरोपीने ॲड. अजय (बंटी) पंडीतराव देशमुख यांच्या मार्फत विद्यमान जिल्हा व सत्र न्यायलय हिंगोली येथे जामीन साठी अर्ज दाखल केला होता. 
विद्यमान न्यायाधिश श्रीमती एस एन माने मॅडम यांनी दि. 12/01/2026 रोजी दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून आरोपीची नियमीत जामीन मंजुर केली.
आरोपीच्या वतीने ॲड.सतिष देशमुख, ॲड.शामकांत देशमुख, ॲड.प्रदिप देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड.अजय (बंटी) पंडीतराव देशमुख, यांनी  युक्तीवाद केला व त्यांना ॲड.शरद देशमुख, ॲड.अदित ऊर्फ शुभम देशमुख ,  ॲड.राहूल देशमुख,  ॲड.योगेश खिल्लारी (पाटील), ॲड.अविनाश राठोड ,ॲड.रजत देशमुख, ॲड.प्रकाश मगरे, ॲड.मुदस्सीर अ.रहिम, ॲड.आनंद खिल्लारे, ॲड.सुमित सातव, ॲड.लखन पठाडे,ॲड.श्रध्दा जैस्वाल , ॲड.आकाश चव्हाण,  ॲड.गजानन घुगे, ॲड.सुजित गायकवाड,ॲड.सुमित कदम, ॲड. तुषार देशमुख,अँड रुपाली खिल्लारे,शेख आदील शेख अजीस, ॲड. तुषार पवार, ॲड. सचिन सोनुने ॲड. संदिप डवले ॲड प्रिया कुरील यांनी सहकार्य केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने