हिंगोली ग्रामीण पोलिसांची कारवाई : अनैतिक व्यापार प्रकरणी महिला ताब्यात

हिंगोली ग्रामीण पोलिसांची कारवाई : अनैतिक व्यापार प्रकरणी महिला ताब्यात 
पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे 

महाराष्ट्र 24न्यूज नेटवर्क 
27 फेब्रुवारी 2026
 हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली असून एका महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. सदर कारवाई दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6.25 वाजताच्या सुमारास प्रविण नगर, महादेव मंदिराच्या पाठीमागील अंधारवाडी परिसरात करण्यात आली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा क्रमांक 00103/2026 अन्वये कलम 3, 4, 5 व 7 अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 अंतर्गत प्रकरण दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणातील  महिला आरोपी  (वय 50 वर्ष, रा. अंधारवाडी, ता. जि. हिंगोली) हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे  
पोलीस अधीक्षक  निलाभ रोहन 
कमलेश मीना dysp कुंदन कुमार वाघमारे पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली 
ही कारवाई 
  पोउपनि श्रीदेवी  वम्गे यांनी केली असून मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी तिच्या राहत्या घरी बाहेरील महिलांना बोलावून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेश्याव्यवसाय चालवत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचून पोलिसांनी छापा टाकला.
कारवाईदरम्यान महिला पंचासमक्ष आरोपीची झडती घेण्यात आली असता, बनावट ग्राहकास देण्यात आलेल्या 500 रुपयांच्या दोन नोटांसह एकूण 5000 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच पांढऱ्या रंगाचा विवो कंपनीचा मोबाईल (अंदाजे किंमत 5000 रुपये) आणि निरोधची दोन पाकिटे (MANforce व CUPID) असा एकूण 10,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
सदर गुन्हा रात्री 9.49 वाजता दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक  श्याम कुमार . डोंगरे हे करीत आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कुंदणकुमार वाघमारे यांनी घटनास्थळी भेट देऊन कारवाईचा आढावा घेतला.
हिंगोली ग्रामीण पोलिसांनी अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा दिला असून परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने