रिसाला नाका येथे मटका जुगारावर छापा; एक जण अटक, मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
20 मार्च 2026
हिंगोली : शहरातील रिसाला नाका परिसरात सुरू असलेल्या अवैध मटका जुगारावर पोलिसांनी धाड टाकून एका आरोपीस अटक केली असून त्याच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण १३,९१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नानाराव पोले यांनी हिंगोली येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याकडे दिलेल्या फिर्यादीत नमूद केले होते की, रिसाला नाका परिसरातील एका पडक्या घरात तसेच बिकानेर स्वीट मार्टजवळ काही व्यक्ती लोकांकडून पैसे घेऊन मटका जुगार चालवत आहेत. यामध्ये मटक्याच्या चिठ्ठ्या देऊन नागरिकांकडून पैसे उकळले जात असल्याची माहिती त्यांनी दिली होती.
पोलीस अधीक्षक निलाभ रोहन पोलीस उपाध्यक्ष कमलेश मीना
उपविभागीय पोलीस अधिकारी
कुंदन कुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शन खाली
कारवाई करण्यात आली
पोलीस कर्मचारी लक्ष्मण भगत.
vr सोनवणे
या कर्मचाऱ्यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला होता
दरम्यान
या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसमवेत संबंधित ठिकाणी सायंकाळी ४.२० वाजता छापा टाकला. छाप्यादरम्यान कल्याण नावाचा मटका जुगार चालवित असलेला इसम पोलिसांच्या हाती लागला. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव किसन नारायण गायलु (वय २६, व्यवसाय मजुरी, रा. रिसाला बाजार, हिंगोली) असे सांगितले.
पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून विविध किंमतीच्या नोटांमध्ये रोख रक्कम, एक जुना वापरता विवो कंपनीचा मोबाईल, तसेच मटक्याच्या आकड्यांच्या चिठ्ठ्या, कार्ड आणि बॉलपेन असे जुगाराचे साहित्य मिळून आले. एकूण १३,९१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा