माधुरी कावरखे यांना पीएच.डी. पदवी प्रदान

माधुरी कावरखे यांना पीएच.डी. पदवी प्रदान

महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क 
28 मार्च 2026
महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या फॅकल्टी ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी अंतर्गत संगणक शास्त्र आणि अभियांत्रिकी विभागातील संशोधक प्रा. माधुरी भास्करराव कावरखे यांना पीएच.डी. पदवी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या या शैक्षणिक यशामुळे शैक्षणिक वर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रा. कावरखे यांनी ‘प्रेडिक्शन ऑफ डायबेटिक सिम्प्टम्स यूजिंग वेअरेबल डिव्हायसेस अॅण्ड एआय’ या अत्याधुनिक आणि आरोग्य क्षेत्रासाठी उपयुक्त अशा विषयावर संशोधन प्रबंध सादर केला. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मधुमेहाच्या लक्षणांचा पूर्वानुमान करण्यावर आधारित या संशोधनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. वेअरेबल डिव्हायसेस आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांच्या साहाय्याने रुग्णांच्या आरोग्य स्थितीचे अचूक विश्लेषण करण्याचा प्रयत्न या संशोधनातून करण्यात आला आहे.
हा प्रबंध स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजीच्या संचालिका डॉ. परमिंदर कौर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे संशोधन अधिक सखोल व परिणामकारक ठरल्याचे मानले जात आहे.
महात्मा गांधी मिशन विद्यापीठाने प्रा. कावरखे यांच्या संशोधन कार्याची दखल घेत त्यास मान्यता दिली असून, त्यांना पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल विद्यापीठातील सहकारी, विद्यार्थी व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने