नांदेड परिक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाला राज्यात प्रथम क्रमांक; श्री. शहाजी उमाप यांचा मुख्यमंत्रीांच्या हस्ते सत्कार

नांदेड परिक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाला राज्यात प्रथम क्रमांक; श्री. शहाजी उमाप यांचा मुख्यमंत्रीांच्या हस्ते सत्कार

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
28मार्च 2026
नांदेड – राज्य शासनाच्या ई-गव्हर्नन्स उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या “150 ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात” नांदेड परिक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशाबद्दल कार्यालयाचे नेतृत्व करणारे शहाजी उमाप यांचा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करून सत्कार करण्यात आला.
ई-गव्हर्नन्सच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे पोलीस प्रशासन अधिक पारदर्शक, वेगवान आणि नागरिकाभिमुख बनले आहे. नांदेड परिक्षेत्रात विविध डिजिटल उपक्रम राबवून तक्रारींचे जलद निवारण, गुन्ह्यांच्या तपासात तंत्रज्ञानाचा वापर आणि नागरिकांना सुलभ सेवा देण्यात आली. या सर्व बाबींमुळेच या कार्यालयाने राज्यात अव्वल स्थान मिळवले.
श्री. उमाप यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीवर मोठ्या प्रमाणात आळा घालण्यात यश आले असून अनेक गुन्ह्यांचा छडा लावून फिर्यादींना त्यांचा मुद्देमाल परत मिळवून देण्यात आला आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील पोलीस यंत्रणेने कायदा व सुव्यवस्था राखताना जनतेचा विश्वास संपादन केला आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्री. शहाजी उमाप यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून त्यांना हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे. पुढील काळातही त्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासन अधिक प्रभावीपणे कार्य करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने