महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने सीईओ विवेक गायकवाड यांचा सत्कार
हिंगोली : हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. विवेक गायकवाड यांचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रभावी व लोकाभिमुख कामकाजाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
या सत्कार समारंभात राज्य ऑडिटर पंडितराव नागरगोजे, जिल्हाध्यक्ष विजय राठोड, कार्याध्यक्ष किरण नागरे, उपाध्यक्ष आत्माराम जाधव, तालुका अध्यक्ष श्याम राऊत तसेच प्रदीप राठोड आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विवेक गायकवाड यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना विवेक गायकवाड यांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की, जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांमध्ये शिक्षकवर्गाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच शैक्षणिक व सामाजिक विकासाच्या कामांना गती मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी गायकवाड यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद अधिक प्रभावीपणे कार्यरत असल्याचे सांगितले. तसेच आगामी काळातही प्रशासन आणि शिक्षक यांच्यातील समन्वय अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमास शिक्षक बांधव, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा