हिंगोलीत भाजपच्या जिल्हा प्रवक्तेपदी विलास गोरे यांची नियुक्ती; ३० वर्षांचा राजकीय अनुभव

हिंगोली भाजपच्या जिल्हा प्रवक्तेपदी विलास गोरे यांची नियुक्ती; ३० वर्षांचा राजकीय अनुभव

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
15 एप्रिल 2026
हिंगोली (प्रतिनिधी) – भारतीय जनता पक्ष (भाजप) हिंगोली जिल्हा प्रवक्तेपदी विलास गोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य पक्ष सचिव तथा हिंगोली जिल्हा प्रभारी रेखाताई कुलकर्णी यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
विलास गोरे यांनी माजी आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला होता. यापूर्वी त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवक्ते म्हणून दीर्घकाळ काम केले असून, सुमारे तीस वर्षांचा राजकीय अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यांच्या या अनुभवाची तसेच भाजपमधील सक्रिय कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
नियुक्तीपत्रावर जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांची स्वाक्षरी असून, ते पत्र रेखाताई कुलकर्णी यांनी गोरे यांना सुपूर्द केले. यावेळी पक्षाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या निवडीबद्दल खासदार रामराव वडकुते, आमदार तानाजी मुटकुळे, माजी आमदार प्रज्ञाताई सातव, जिल्हाध्यक्ष गजानन घुगे, माजी जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, सुभाषचंद्र लदनिया, माजी जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद यंबल, जिल्हा सरचिटणीस उमेश नागरे, तसेच संजय कावडे, रवी पाटील गोरेगावकर, बाबा घुगे, संजय ढोके, रजनीश पुरोहित, श्रीरंग राठोड, मनोज शर्मा, संजय खंडेलवाल, पवन उपाध्याय, कैलास शहाणे, लखन कुरिल, अमित रुहाटिया, महेश शहाणे, राहुल मेने, प्रतिक अग्रवाल आदींनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने