भांडेगाव येथे HPV लसीकरण मोहिमेअंतर्गत प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम उत्साहात

भांडेगाव येथे HPV लसीकरण मोहिमेअंतर्गत प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम उत्साहात

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
16 एप्रिल2026
हिंगोली, प्रतिनिधी – हिंगोली जिल्ह्यातील भांडेगाव येथे एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहिम यशस्वीरित्या राबविण्यात आली असून, लसीकरण पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम हिंगोली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी  डॉ. देवेंद्र जायभाये यांचेही या उपक्रमासाठी मार्गदर्शन करत आहेत 
हिंगोली जिल्ह्यात HPV लसीकरणासाठी एकूण १०,२२५ लाभार्थी नोंदणीकृत असून, त्यापैकी आतापर्यंत २२५ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. या मोहिमेचा उद्देश महिलांमध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण करणे हा आहे.
या कार्यक्रमाला मेडिकल ऑफिसर डॉ. अलोक गट्टू, आरोग्य सहाय्यक जायभाये, तालुका समूह संघटक मारोती सोलापूर, आशा वर्कर सुपरवायझर तसेच भांडेगाव सर्कलमधील सर्व आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
दरम्यान, हिंगोली जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच ग्रामीण जिल्हा रुग्णालयात HPV लस उपलब्ध असून, पात्र लाभार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने