लिंबाळा मक्ता येथे अल्पवयीनावर जीवघेणा हल्ला; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल एक आरोपी ताब्यात
पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
06मे 2026
हिंगोली तालुक्यातील लिंबाळा मक्ता येथे एका अल्पवयीन मुलावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सय्यद असद सय्यद शौकत (वय 17 वर्षे, रा. लिंबाळा मक्ता, ता. जि. हिंगोली) याला आरोपी शेख अमन शेख शानदार याने आपल्या घरी बोलावले होते. फिर्यादी हा आरोपीचा मित्र असल्याने तो त्याच्या घरी गेला असता, तेथे आरोपी शेख शानदार शेख सुलेमान आणि शेख अमन शेख शानदार यांनी त्याच्याशी वाद घातला.
“तू माझ्या मुलाला का बिघडवत आहेस” या कारणावरून संतापलेल्या आरोपींनी फिर्यादीवर हल्ला केल्याचा आरोप आहे. आरोपी शेख शानदार याने लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यावर प्रहार करून त्याला गंभीर जखमी केले. तसेच दुसऱ्या आरोपीने काठीने कमरेवर मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
ही घटना दिनांक 4 मे 2026 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. जखमीच्या वैद्यकीय अहवाल (एमएलसी) व जबाबाच्या आधारे 5 मे 2026 रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्हा पोलीस उपनिरीक्षक राहुल घुले यांनी नोंदवला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीदेवी वग्गे करीत आहेत. घटनास्थळाची पाहणी करून अधिक तपास सुरू असून फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक श्याम कुमार डोंगरे यांनी महाराष्ट्र 24 न्यूजला दिली
टिप्पणी पोस्ट करा