तलवार बाळगल्याच्या प्रकरणात आरोपीची निर्दोष मुक्तताॲड जी के गायकवाड

तलवार बाळगल्याच्या प्रकरणात आरोपीची निर्दोष मुक्तता
ॲड जी के गायकवाड 

महाराष्ट्र24 न्यूज नेटवर्क 
06 मे 2026
हिंगोली – शहरातील तलवार बाळगल्याच्या प्रकरणात न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केल्याचा निकाल दिला आहे. सदर प्रकरणात पुराव्याअभावी न्यायालयाने हा निर्णय दिला.
या प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी की, दिनांक 17 नोव्हेंबर 2022 रोजी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 368/2022 अंतर्गत भारतीय हत्यार कायदा कलम 4 व 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी पोलीस कर्मचाऱ्यांना कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, आरोपी नितीन सिंग राजपूत हा इंचा येथे हनुमान मंदिरासमोरील रस्त्यावर दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तलवार बाळगत आहे.
मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पोलीस पथकाने घटनास्थळी छापा टाकून दोन पंचांच्या उपस्थितीत आरोपीकडून तलवार जप्त केली होती. त्यानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पूर्ण करून प्रकरण प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणाची नोंद RCC क्र. 484/2022 अशी झाली.
सरकारी पक्षाकडून एकूण पाच साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. मात्र, सादर केलेल्या पुराव्यांमध्ये ठोसपणा नसल्यामुळे न्यायालयात आरोपीविरुद्ध आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत.
दिनांक 5 मे 2026 रोजी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी पमनानी मॅडम, हिंगोली यांनी दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद ऐकून, पुराव्याअभावी आरोपी नितीन सिंग राजपूत यांची निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. जी. के. गायकवाड पाटील यांनी प्रभावी बाजू मांडली. त्यांना ॲड. रवीकुमार जाधव व एस. एस. पतंगे यांनी सहकार्य केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने