लसिना फाटा येथील वर्मा पेट्रोल पंपावर अवैध डिझेल पुरवठ्याचा आरोप; जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी

लसिना फाटा येथील वर्मा पेट्रोल पंपावर अवैध डिझेल पुरवठ्याचा आरोप; जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
26 मे 2026 
हिंगोली | प्रतिनिधी
हिंगोली-कलमनुरी राष्ट्रीय महामार्गावरील मौजे लसिना फाटा येथे असलेल्या वर्मा पेट्रोल पंपावर अवैध डिझेल पुरवठा होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून याप्रकरणी जिल्हाधिकारी हिंगोली यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. संबंधित पेट्रोल पंपावर मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचाही आरोप तक्रारदारांनी केला आहे.
तक्रारीनुसार, संबंधित पेट्रोल पंपावर डिझेलचा अवैधरित्या साठा करून तो अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या रेती माफियांना पुरविला जात असल्याचे म्हटले आहे. आवश्यक सेवांसाठी डिझेल साठवून ठेवण्यात आल्याचे कारण देत हा पुरवठा सुरू असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या नागरिकांशी पेट्रोल पंपावरील संबंधितांकडून उद्धट व अपमानास्पद भाषेत वागणूक देण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
या प्रकरणाची जिल्हा प्रशासनाने सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे. तसेच अवैध वाळू वाहतूक आणि इंधन पुरवठा यामागील साखळी उघड करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
ही तक्रार ओकार गजानन टवले , केशव रामकिशन पवार, प्रशांत चंद्रभान पाईकराव  आणि पाईकराव  यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने