बकरी ईदनिमित्त हिंगोली शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल२८ मे रोजी सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत पर्यायी मार्ग लागू

बकरी ईदनिमित्त हिंगोली शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल
२८ मे रोजी सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत पर्यायी मार्ग लागू

महाराष्ट्र 24 न्यूज 
हिंगोली, दि. २८ मे २०२६ :
बकरी ईद निमित्त औंढा रोडवरील ईदगाह येथे हजारो मुस्लिम बांधव नमाज अदा करण्यासाठी एकत्र येणार असल्याने हिंगोली शहरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये तसेच शहरात शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३६ अन्वये विशेष वाहतूक अधिसूचना जारी केली आहे.
ही अधिसूचना दि. २८ मे २०२६ रोजी सकाळी ७.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत लागू राहणार आहे.
वाहतुकीस पूर्णपणे बंद असलेले मार्ग
खालील मार्गांवरून ईदगाहकडे जाणारी वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे :

नांदेड नाका
एन.टी.सी. गेट
बसस्थानक पूर्वेकडील गेट
बावन खोली रोड
संभाजी शाळेजवळील रोड

तसेच,
कयाधू नदीकडून नांदेड नाका येथे येणारा रस्ता पूर्णतः बंद राहील.
जड वाहनांना प्रवेश बंद
खालील ठिकाणांवरून हिंगोली शहरात येणाऱ्या सर्व जड वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे :

नर्सी टी पॉईंट
खटकाळी बायपास

अकोला बायपास 
वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग
औंढा / सेनगावकडे जाणारी वाहतूक
हिंगोली शहरातून औंढा किंवा सेनगावकडे जाणाऱ्या वाहनांसाठी खालील पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे :

इंदिरा चौक → गांधी चौक → फुल मंडी → गोदावरी कॉर्नर → मेहराज उलूम मस्जिद → खाकी बाबा चौक → कब्रस्तान → कयाधू नदी पूल → नर्सी टी पॉईंट
नांदेडकडे जाणारी वाहतूक

हिंगोली शहरातून नांदेडकडे जाणाऱ्या वाहनांसाठी :

इंदिरा चौक → नांदेड नाका → रेल्वे गेट → खटकाळी बायपास → उमरा पाटी
जड वाहनांसाठी विशेष मार्ग
वाशिमकडून नांदेडकडे जाणाऱ्या जड वाहनांसाठी :
अकोला बायपास → खटकाळी बायपास → नांदेड मार्ग

नर्सीकडून येणाऱ्या जड वाहनांसाठी 
नर्सी टी पॉईंटवरून औंढाकडे वळविण्यात येणार
वाहतुकीसाठी खुले असलेले प्रमुख रस्ते
खालील प्रमुख मार्ग नियमित वाहतुकीसाठी खुले राहतील :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर च
गांधी चौक
इंदिरा चौक
नांदेड नाका
छत्रपती शिवाजी महाराज चौक
पोलीस प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक कोंडी टाळावी, असे आवाहन   पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांनी केले आहे 


-

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने