लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध; गर्भपातासाठी दबाव एकावर गुन्हा आरोपी अटक . पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे

लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध; गर्भपातासाठी दबाव  एकावर गुन्हा  आरोपी अटक 
पोलीस निरीक्षक  शामकुमार डोंगरे 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
हिंगोली, दि. ३० मे : लग्नाचे आश्वासन देत एका महिलेसोबत दीर्घकाळ शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केल्याचा तसेच गर्भपात करण्यासाठी दबाव टाकल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आले 
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला , फिर्यादी   (वय ३२)   दिलेल्या तक्रारीनुसार, वैजनाथ नामदेव शिंदे (रा. बोडखी, ता. जि. हिंगोली) याने लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
तक्रारीनुसार, हा प्रकार १ जानेवारी २०१२ ते १० मे २०२६ या कालावधीत घडला. दरम्यान फिर्यादी गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने "गर्भपात केलास तरच मी तुझ्याशी लग्न करेन, अन्यथा मी तुझ्याशी बोलणार नाही आणि लग्नही करणार नाही," असे सांगून मानसिक दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर आरोपीने फिर्यादीशी संपर्क तोडल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादीच्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३६८/२०२६ अन्वये कलम ६९, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला अटक करून 
 पोलीस उपनिरीक्षक श्रीदेवी वग्गे
ह्या तपास  करत आहेत 

 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने