ॲट्रोसिटी व खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर...!
अँड अजय उर्फ बंटी देशमुख
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
21 मे 2016
Hingoli : ॲट्रोसिटी तसेच खुनाच्या प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या निर्णयामुळे कायदेविषयक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
प्रकरणातील सविस्तर माहिती अशी की, दि. 17 नोव्हेंबर 2024 रोजी Hingoli City Police Station येथे फिर्यादीने तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, दि. 9 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास जीजामाता नगर परिसरातील बौद्ध विहाराजवळ आरोपींनी फिर्यादीस जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर खंजीराने हल्ला करून डोके, छाती व डाव्या हाताच्या दंडावर गंभीर जखमा केल्या. यावेळी फिर्यादीच्या पत्नी व बहिणीस देखील शिवीगाळ करून बेल्टने मारहाण करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.
या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 781/2024 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 109, 115(2), 118(1), 3(5), 352 तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलम 3(1)(r), 3(1)(s), 3(2)(v), 3(2)(va) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यातील अटक आरोपी अमोल अशोकराव जामकर यांनी ॲड. अजय उर्फ बंटी पंडीतराव देशमुख यांच्या मार्फत जिल्हा व सत्र न्यायालय, हिंगोली येथे जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर दि. 14 मे 2026 रोजी सुनावणी झाली. यावेळी मा. सत्र न्यायाधीश श्रीमती एस. एन. माने यांनी दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून आरोपीस जामीन मंजूर केला.
आरोपीच्या वतीने ॲड. सतीश देशमुख, ॲड. शामकांत देशमुख व ॲड. प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. अजय (बंटी) पंडीतराव देशमुख यांनी प्रभावी युक्तीवाद केला. त्यांना ॲड. शरद देशमुख, ॲड. अदित उर्फ शुभम देशमुख, ॲड. राहुल देशमुख, ॲड. योगेश खिल्लारी (पाटील), ॲड. रजत देशमुख, ॲड. अविनाश राठोड, ॲड. प्रकाश मगरे, ॲड. सुमित सातव, ॲड. आनंद खिल्लारे, ॲड. मुदस्सीर अ. रहिम, ॲड. आकाश चव्हाण, ॲड. श्रद्धा जैस्वाल, ॲड. लखन पठाडे, ॲड. गजानन घुगे, ॲड. सुमित कदम, ॲड. तुषार देशमुख, ॲड. रुपाली खिल्लारे, शेख आदिल शेख अजीस, ॲड. सचिन सोनुने, ॲड. संदीप डवले, ॲड. शिवम देशमुख, ॲड. प्रिया कुरील, ॲड. हरपालसिंग सेठी व ॲड. महावीरसिंग चौहान यांनी सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा