प्रतिबंधित गुटखा वाहतूक प्रकरणात ₹7.38 लाखांचा मुद्देमाल जप्त; दोन्ही आरोपींना न्यायालयाकडून जामीन
ॲड अजय उर्फ बंटी देशमुख
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
01जून 2026
हिंगोली, प्रतिनिधी : प्रतिबंधित गुटखा व पान मसाल्याची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी, हिंगोली यांनी जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी ₹7 लाख 38 हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून संबंधित आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्राप्त माहितीनुसार, दि. 30 मे 2026 रोजी पोलीस स्टेशन बासंबा येथे फिर्यादीने तक्रार दाखल केली होती. तक्रारीत नमूद केल्यानुसार, वाशीम-हिंगोली रोडवरील बासंबा पाटी परिसरात आरोपी त्यांच्या ताब्यातील कारमधून शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व पान मसाला अवैधरित्या वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले. या कारवाईदरम्यान पोलिसांनी एकूण ₹7,38,000 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 123, 274, 275 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 मधील कलम 26(2)(i), 26(2)(iv), 30(2)(a) व 59 अन्वये पोलीस स्टेशन बासंबा येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना दि. 31 मे 2026 रोजी न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी, हिंगोली यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींच्या वतीने ॲड. अजय उर्फ बंटी पंडीतराव देशमुख यांनी जामिनासाठी अर्ज सादर केला. या अर्जावर दिवसभर सुनावणी होऊन सायंकाळी उशिरापर्यंत दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेण्यात आला.
सुनावणीअंती मा. न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी हिंगोली श्रीमती एस. एस. पलसुले यांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद विचारात घेऊन आरोपींना जामीन मंजूर करण्याचे आदेश दिले.
आरोपींच्या वतीने ॲड. सतीश देशमुख, ॲड. शामकांत देशमुख व ॲड. प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. अजय (बंटी) पंडीतराव देशमुख यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांना ॲड. शरद देशमुख, ॲड. अदित उर्फ शुभम देशमुख, ॲड. राहुल देशमुख, ॲड. योगेश खिल्लारी (पाटील), ॲड. रजत देशमुख, ॲड. अविनाश राठोड, ॲड. प्रकाश मगरे, ॲड. सुमित सातव, ॲड. आनंद खिल्लारे, ॲड. मुदस्सीर अ. रहिम, ॲड. आकाश चव्हाण, ॲड. लखन पठाडे, ॲड. गजानन घुगे, ॲड. सुमित कदम, ॲड. तुषार देशमुख, ॲड. रुपाली खिल्लारे, शेख आदिल शेख अजीस, ॲड. सचिन सोनुने, ॲड. संदीप डवले, ॲड. शिवम देशमुख, ॲड. प्रिया कुरील, ॲड. हरपालसिंग सेठी व ॲड. महावीरसिंग चौहान यांनी सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा