हिंगोली दौऱ्यात मा. आ. रोहितदादा पवार यांचा जाहीर सत्कारॲड. अजय (बंटी) पंडीतराव देशमुख यांच्या निवासस्थानी विविध संघटनांकडून गौरव; युवा क्रिकेटपटूंशी साधला संवाद

हिंगोली दौऱ्यात मा. आ. रोहितदादा पवार यांचा जाहीर सत्कार
ॲड. अजय (बंटी) पंडीतराव देशमुख यांच्या निवासस्थानी विविध संघटनांकडून गौरव; युवा क्रिकेटपटूंशी साधला संवाद

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
27जून 2026
हिंगोली, प्रतिनिधी : हिंगोली येथे आयोजित भव्य शेतकरी मोर्च्यानिमित्त दौऱ्यावर आलेले मा. आ. रोहितदादा पवार यांनी माजी एपेक्स कौन्सिल सदस्य, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे ॲड. अजय (बंटी) पंडीतराव देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी विविध सामाजिक, क्रीडा व व्यावसायिक संघटनांच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.
जिल्हा क्रिकेट असोसिएशन, हिंगोली, जिल्हा वकील संघ, हिंगोली, व्यापारी संघ, हिंगोली, बंजारा समाज, हिंगोली तसेच देशमुख परिवाराच्या वतीने आयोजित या सत्कार सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात रोहितदादा पवार यांचे स्वागत करत त्यांच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी जिल्हा क्रिकेट असोसिएशन, हिंगोलीच्या पदाधिकाऱ्यांनी हिंगोली जिल्ह्यासाठी क्रिकेट मैदान उपलब्ध करून देण्यासाठी रोहितदादा पवार यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. त्यांच्या पुढाकारामुळे जिल्ह्यातील क्रिकेटला नवी दिशा मिळणार असून ग्रामीण भागातील युवा खेळाडूंना आधुनिक सुविधा आणि दर्जेदार सरावाची संधी उपलब्ध होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
सत्कारानंतर रोहितदादा पवार यांनी जिल्हा क्रिकेट असोसिएशन, हिंगोलीच्या युवा क्रिकेटपटूंशी संवाद साधला. यावेळी त्यांनी यश मिळविण्यासाठी मेहनत, शिस्त, सातत्य आणि जिद्द या चार गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे सांगत खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांच्या संवादामुळे युवा क्रिकेटपटूंमध्ये नवचैतन्य आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या प्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवर, क्रिकेटप्रेमी, वकील, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, समाजबांधव तसेच देशमुख परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्कार सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने