कळमनुरीत गोळीबार; एकाचा मृत्यू, चौघांवर जीवघेणा हल्ला, 16 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

कळमनुरीत गोळीबार; एकाचा मृत्यू, चौघांवर जीवघेणा हल्ला, 16 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
दि. 16 जुलै : कळमनुरी शहरातील जुने बसस्थानक परिसरात जुन्या वादातून झालेल्या गोळीबारात लुकमान सिद्दीकी ताजोदिन सिद्दीकी (वय 38, रा. जुने बसस्थानक, कळमनुरी) यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात 16 आरोपींविरुद्ध खुनासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपी फरार आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 15 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 10.45 वाजण्याच्या सुमारास जुने बसस्थानक परिसरात ही घटना घडली. फिर्यादी शेरू उर्फ इम्माण अफरोज पठाण (वय 16, रा. पठाण मोहल्ला, कळमनुरी) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी संगनमत करून स्कार्पिओ वाहन व मोटारसायकलींवर घटनास्थळी येत बेकायदेशीर जमाव जमविला. त्यानंतर लुकमान सिद्दीकी यांच्यावर जिवे मारण्याच्या उद्देशाने बंदुकीतून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात लुकमान सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. तसेच फिर्यादीसह त्यांच्या सोबत असलेल्या साक्षीदारांवरही गोळीबार करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या घटनेत ओसामा सिद्दीकी, सारिया सिद्दीकी, इम्माण पठाण आणि मेहराज पठाण हे जखमी झाले आहेत.
या प्रकरणी शेख शकील शेख खलील, शेख जम्मु शेख खलील, शेख जमीर शेख खलील, शेख समीर शेख खलील, अझहर पठाण, शाहीन नाईक, फयुम नाईक, किशोर भालेराव (नगरसेवक), शेख फारुख, शेख असिफ शेख खलील, साहील नाईक, शेख शहबाज शेख अशपाक, सय्यद फारुख सय्यद रहीम, मुस्तकीन शेख गणी, इम्बान खान दाऊद खान पठाण आणि शिबगत उर्फ शिबू खसलत नाईक (सर्व रा. कळमनुरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 103(1), 109, 115(2), 189(1), 189(2), 189(4), 191(1), 191(2), 191(3), 352 तसेच शस्त्र अधिनियमातील कलम 3 व 25 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दि. 16 जुलै 2026 रोजी सकाळी 8.38 वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली. हा गुन्हा एमएलसी जबाबावरून दाखल करण्यात आला

पोलीस अधीक्षक श्रनिक लोढा 
पोलीस उपविभागीय अधिकारी कुंदन कुमार वाघमारे 
यांच्या मार्गदर्शनाखाली 
  सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. शेवाळे यांनी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जमीर ए. नाईक करीत असून सर्व आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी (हिंगोली शहर) तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि कळमनुरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Post a Comment

أحدث أقدم