पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार स्वीकारला



पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार स्वीकारला

महाराष्ट24न्यूज नेटवर्क 
वाशिम, दि. १८ : वाशिम जिल्हा पोलीस दलातील प्रशासकीय बदल्यांनंतर पोलीस निरीक्षक सुधाकर भाऊसिंग आढे यांनी स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), वाशिम येथील पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. यापूर्वी ते आर्थिक गुन्हे शाखा, वाशिम येथे कार्यरत होते.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम २२ (न) पोटकलम (१) व (२) अंतर्गत जिल्हा स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाच्या दि. १७ जुलै २०२६ रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत.

बदली आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) येथील पोलीस निरीक्षक प्रदीप अशोकसिंग परदेशी यांची आर्थिक गुन्हे शाखा, वाशिम येथे बदली करण्यात आली आहे. तर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर भाऊसिंग आढे यांची स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) येथे नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी नव्या पदाचा पदभार स्वीकारला आहे.

पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त होऊन नव्या नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचा कार्यभार स्वीकारला असून, जिल्ह्यातील गुन्हे उघडकीस आणणे, विशेष मोहिमा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने त्यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या कामकाजाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने