कळमनुरी खून प्रकरणातील आरोपी सुरेश सातव यांना जामीन मंजूर
हिंगोली न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय; ॲड. अजय (बंटी) देशमुख यांनी केला प्रभावी युक्तिवाद
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
09 सप्टेंबर 2026
हिंगोली/ कळमनुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या खूनाच्या गंभीर प्रकरणातील अटक आरोपी सुरेश विठ्ठलराव सातव यांना हिंगोली येथील मा. न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे. मा. वि. न्यायाधीश श्री. डी. जी. ढोबळे यांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला.
प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. २४०/२०२६, दि. २४ मे २०२६ रोजी दाखल करण्यात आला होता. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, दि. २३ मे २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ८.४० वाजता आरोपींनी फिर्यादीच्या मुलाला जिवे ठार मारण्याचा नियोजित कट रचल्याचा आरोप करण्यात आला होता.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, संबंधित व्यक्तीला कपील बार, साईनगर, कळमनुरीच्या बाजूला असलेल्या रेतीच्या ढिगाजवळ नेऊन डोक्यात दगड मारून त्याचा खून करण्यात आला, असा आरोप आहे. या प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १०३(१) व ६१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर प्रकरणात अटक आरोपी सुरेश विठ्ठलराव सातव यांनी नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. आरोपीच्या वतीने ॲड. अजय उर्फ बंटी पंडीतराव देशमुख यांनी न्यायालयात बाजू मांडली. जामीन अर्जावर झालेल्या सुनावणीदरम्यान दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून मा. न्यायालयाने दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी आरोपीचा नियमित जामीन मंजूर केला.
आरोपीच्या वतीने ॲड. सतीश देशमुख, ॲड. शामकांत देशमुख व ॲड. प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. अजय (बंटी) पंडीतराव देशमुख यांनी काम पाहून न्यायालयात प्रभावी युक्तिवाद केला.
या कायदेशीर प्रक्रियेत ॲड. शरद देशमुख, ॲड. अदित उर्फ शुभम देशमुख, ॲड. राहुल देशमुख, ॲड. योगेश खिल्लारी (पाटील), ॲड. रजत देशमुख, ॲड. अविनाश राठोड, ॲड. प्रकाश मगरे, ॲड. सुमित सातव, ॲड. श्रद्धा जैस्वाल, ॲड. आनंद खिल्लारे, ॲड. शुभम कदम, ॲड. मुदस्सीर अ. रहिम, ॲड. आकाश चव्हाण, ॲड. लखन पठाडे, ॲड. गजानन घुगे, ॲड. सुमित कदम, ॲड. तुषार देशमुख, ॲड. रुपाली खिल्लारे, शेख आदिल शेख अजीस, ॲड. सचिन सोनुने, ॲड. संदीप डवले, ॲड. शिवम देशमुख, ॲड. प्रिया कुरील, ॲड. हरपालसिंग सेठी व ॲड. महावीरसिंग चौहान यांनी सहकार्य केले.
खूनासारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात आरोपीला न्यायालयाकडून नियमित जामीन मंजूर झाल्याने या निर्णयाकडे कायदेवर्तुळाचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा