अभियंता दिन उत्साहात साजराहिंगोलीत रक्तदान शिबिराचे आयोजन; ३० अभियंत्यांचे रक्तदान

अभियंता दिन उत्साहात साजरा
हिंगोलीत रक्तदान शिबिराचे आयोजन; ३० अभियंत्यांचे रक्तदान

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
16 सप्टेंबर 2026 
हिंगोली : भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या १६६ व्या जयंतीनिमित्त अभियंता दिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद अभियंता संघटना, जिल्हा शाखा हिंगोलीच्या वतीने शहरातील शिवलीला पॅलेस येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभियंता क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, प्रकल्प संचालक डॉ. एन. आर. केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती समृद्धी दिवाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गड्डापोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता इंजि. सुरेश जोशी, इंजि. आर. एस. नरवाडे, इंजि. बी. एम. शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय बोराटे यांच्यासह जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा राज्याध्यक्ष इंजि. रा. ना. कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष तथा राज्याध्यक्ष इंजि. रा. ना. कुलकर्णी यांनी केले. अभियंता दिनाचे महत्त्व, अभियंत्यांची विकासकामांमधील भूमिका तसेच जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांमध्ये अभियंत्यांचे योगदान याबाबत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. विश्वेश्वरय्या यांनी देशाच्या अभियांत्रिकी व जलव्यवस्थापन क्षेत्रात दिलेले योगदान, त्यांची कार्यनिष्ठा आणि दूरदृष्टी याविषयी त्यांनी माहिती दिली. अभियंता दिन हा केवळ अभियांत्रिकी क्षेत्राचा गौरव करण्याचा दिवस नसून समाजाच्या आणि देशाच्या विकासासाठी अभियंत्यांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेची जाणीव करून देणारा दिवस असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
अभियंता दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमस्थळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या सामाजिक उपक्रमाला अभियंता व अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण ३० जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. अभियंता दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद अभियंता संघटना, जिल्हा शाखा हिंगोलीचे कोषाध्यक्ष इंजि. सचिन कोकडवार, उपाध्यक्ष रामेश्वर बोरकर, उपाध्यक्ष प्रमोद उबाळे, संघटक विकास लहाने, संघटक माधव दळवे, जिल्हा सचिव संदेश जाधव, कार्याध्यक्ष बारी खान, सहसचिव गजानन राठोड, सहकोषाध्यक्ष संतोष बाऱ्हाटे, सल्लागार राजाराम चंदाले, महिला प्रतिनिधी सौ. आर. एन. सोनटक्के, महिला प्रतिनिधी इंजि. निकिता पाटील यांच्यासह संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
अभियंता दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातून अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्याबरोबरच रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमातून समाजसेवेचा संदेशही देण्यात आला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने