जिल्हा परिषदेत संविधान दिन उत्साहात साजरा; संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचनमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या उपस्थितीत संविधानिक मूल्यांचे जतन करण्याचा संकल्प

जिल्हा परिषदेत संविधान दिन उत्साहात साजरा; संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन

मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या उपस्थितीत संविधानिक मूल्यांचे जतन करण्याचा संकल्प

हिंगोली, दि. २६ नोव्हेंबर : भारतीय संविधानाच्या निर्मितीचा गौरवशाली इतिहास आणि लोकशाही मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करणारा संविधान दिन गुरुवारी हिंगोली जिल्हा परिषद कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संविधानातील मूलभूत मूल्यांचे जतन आणि संवर्धन करण्याची सामूहिक बांधिलकी व्यक्त केली.

भारतीय संविधान हे देशाच्या लोकशाही व्यवस्थेचा भक्कम आधारस्तंभ असून, संविधानाने प्रत्येक नागरिकाला न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही महत्त्वपूर्ण मूल्ये प्रदान केली आहेत. या मूल्यांच्या माध्यमातून देशाची एकता, अखंडता आणि सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्याचे महत्त्व संविधान दिनानिमित्त अधोरेखित करण्यात आले. संविधानाने दिलेल्या अधिकारांसोबतच प्रत्येक नागरिकाने आपल्या कर्तव्यांचीही जाणीव ठेवून लोकशाही अधिक बळकट

करण्यासाठी योगदान द्यावे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या उपस्थितीत झालेल्या या सामूहिक वाचनातून संविधानातील आदर्श आणि तत्त्वांचे पालन करण्याचा संकल्प करण्यात आला. शासकीय सेवेत कार्यरत असताना संविधानाने दिलेल्या समता, न्याय आणि बंधुतेच्या तत्त्वांनुसार सर्वसामान्य नागरिकांना सेवा देणे, तसेच प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता व समानतेची भावना जोपासणे, याचे महत्त्वही या निमित्ताने अधोरेखित झाले.

या कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) समृद्धी दिवाणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) केशव गडापोड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) विजय बोराटे, शिक्षणाधिकारी विपुल भागवत, मंजुश्री कल्लेवाड, संदीप सोनटक्के, उपशिक्षण अधिकारी आसावरी काळे, समाजकल्याण अधिकारी आशाकिरण ठाकूर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र पुरी, जिल्हा कृषी अधिकारी अतुल वायसे, कार्यकारी अभियंता राजू नरवाडे यांच्यासह जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संविधान दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद कार्यालयात झालेल्या या सामूहिक वाचनातून भारतीय संविधानाप्रती आदर व्यक्त करण्यासोबतच लोकशाही मूल्यांचे पालन करण्याचा संदेश देण्यात आला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने