हिंगोली पोलीस ठाण्यात आज 13 अर्ज निकाली

*एका दिवसात तेरा अर्ज निकाली*
*हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनचा उपक्रम*

महाराष्ट्र 24 न्यूज
19 नोव्हेंबर 2020

मा.पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशाने प्रत्येक गुरुवारी पो.स्टे.अंतर्गत प्रलंबीत अर्ज निपटारा दिन आयोजित करण्यात येत असतो
   आज दि.१९/११/२०२० रोजी मा.सहा.पोलीस अधीक्षक श्री.यतीष देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स्टे.अर्ज निपटारा मोहीम आयोजीत करण्यात आली होती.
सदर मोहिमेमध्ये प्रलंबीत अर्जामधिल अर्जदार व गैरअर्जदार यांना समक्ष पो.स्टे.ला बोलावुन अर्जासंबंधाने विचारपुस व चौकशी करुन पो.स्टे.हिंगोली ग्रामीण येथील एकुण १३ अर्ज निकाली काढण्यात आले आहेत.
सदर मोहीमेमध्ये मा.सहा.पोलीस अधीक्षक श्री यतीष देशमुख,सहा.पोलीस निरीक्षक बी.आर.बंदखडके ,पोउपनि राहुल  तायडे मपोउपनि बि.एच.कांबळे,पो.स्टे.चे बीट अंमलदार तसेच अर्जदार व गैरअर्जदार हे उपस्थित होते

Post a Comment

أحدث أقدم