हट्टा पोलिसांनी लावले दिशा फलक राज्यभरात कौतुक

पोलीस स्टेशनचा कौतुकास्पद उपक्रम
अपघात प्रवण क्षेत्र मार्गावर पोलिसांच्या मदतीने लागले दहा दिशादर्शक फलक

अन्.. अपघात टाळण्यासाठी पोलिस रस्त्यावर

प्रतिनिधी / हिंगोली
गेल्या एका वर्षांपासून झेरो फाटा टी पॉइंट ते जवळा बाजार मार्गाचे काम सुरू झाल्यानंतरही हट्टा- आडगाव जवळा बाजार या रस्त्यांवर वळणावर दिशादर्शक फलक नव्हते. हे फलक लावावे म्हणून संबंधित कॉन्ट्रॅक्टरला लेखी पत्रही दिले. मात्र त्यानंतर अपघात वाढत असल्याने दिशादर्शक फलक लावण्यासंदर्भात वारंवार मागणी करण्यात आली; पण त्याची दखल न घेतल्यामुळे हट्टा पोलिसांनी पुढाकार घेत १० दिशादर्शक फलक या रस्त्यांवर लावले आहेत.
हट्टा जवळाबाजार या मार्गावरील पोलिसांच्या मदतीने लावलेल्या या दिशादर्शक फलकावर अपघात प्रवण क्षेत्र, ज्या ठिकाणी वळणाचा रस्ता आहे त्याठिकाणी त्या टर्न असलेला दिशादर्शक फलक दिले आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ज्या ठिकाणी अपघात होतात त्या ठिकाणाहून प्रवास करताना सहजपणे जाता येणार आहे.

‘हे शासकीय फलकासारखेच हे फलक असले तरी त्यासाठीचा खर्च मात्र सामाजिक सहभागातून हट्टा पोलिसांच्या मदतीने केला आहे. हट्टा पोलीस स्टेशन हद्दीत हायवे रोड वर मागील काही दिवसात अपघातात ६ लोकांना जीव गमवावा लागला ही बाब लक्षात घेत २ डिसेंबर रोजी मा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, यांच्या आदेशानुसार व अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, आयपीएस अधिकारी यतिष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हद्दीतील तीव्र धोकादायक वळणावर व वारंवार अपघात होणारे ठिकाणी हट्टा पोलिसांच्या मदतीने १० दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत.

काय म्हणतात, हट्टा पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन मोरे…..
आम्ही १० दिशादर्शक फलक ठिकठिकाणी लावले असून या मार्गावरील सर्व प्रवाशी- नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून आपले आणि आपले कुटुंबाचे जीविताचे रक्षण करावे व पोलिसांना सहकार्य करावे.यातून प्रवाशांची गैरसोय दूर होईल.असे मत महाराष्ट्र24 न्यूजशी बोलतांना हट्टा पोलिस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक  गजानन मोरे यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

या फलकामुळे अनेक अपघातापासून बचाव होणार असून अनेकांना जीवदान मिळू शकते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने