*ईरटीका मधून केली जात होती गुटख्याची वाहतूक; स्थानिक गुन्हे शाखेने केला पर्दाफाश*
गुन्हे शाखेचा पदभार स्वीकारल्यानंतर मोठी अवैध धंद्यावर मोठी कारवाई
जिल्ह्यात अवैध धंदे चालू देणार नाही उदय खंडेराय
हिंगोली- काही केल्या गुटख्याची वाहतूक ही कमी झालेली नाही. एका ईरटीका गाडीतून गुटख्याची वाहतूक केली जात असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मारलेल्या छाप्यात उघड झाले. यामध्ये ३ लाख रुपये किंमतीचा गुटखा व कार असा १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
हिंगोली तालुक्यातील नरसी भागात एका कार मधून गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सपो अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोनि उदय खंडेराय, पोउपनी शिवसांब घेवारे, जमादार विलास सोनवणे, शंकर जाधव, ज्ञानेश्वर सावळे,किशोर सावंत पथकातील आदी कर्मचाऱ्यानी नरसी नामदेव परिसरात बारकाईने वाहनांची तपासणी सुरू केली. अचानक वाहनांची तपासणी केल्याने, वाहन चालक ही चांगलेच गोंधळात पडले होते.
*पोत्यात अढळला गुटखा*
ईरटीका कारची तपासणी केली असता, त्या मध्ये पोते आढळून आले, पोते उघडून पाहतात तर त्यात गुटखा आढळून आला. त्यामुळे अजून तपासणी करून कार मधील गोपाल आत्माराम रंजवे, विनोद भागवत रंजवे दोघेही रा. भोखरखेड ता. रिसोड जि वाशिम या दोघांची कसून चोकशी केली तर हा गुटखा हिंगोलीत पोहोचवत असल्याची कबुली दिली.
*आरोपी विरुद्ध केला गुन्हा दाखल*
तीन लाखांच्या गुटख्यासह कार जप्त करून, दोघा विरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मात्र गुटखा नेमका कुठं नेला जात होता, कोणी मागणी केली होती. याची सर्व चोकशी केली जात आहे.
जिल्ह्यात अवैध धंदे कुठे सुरू असतील तर पोलीस अधीक्षक यांना संपर्क करा अशी माहिती पोलिस विभागाच्या वतीने देण्यात आली आहे
إرسال تعليق