ख्रिसमस उत्सव ऑनलाइन पद्धतीने साजरा
हिंगोली, दि : 25-12-2020
येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये ख्रिसमस उत्सव ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात येशु ख्रिस्ताच्या जन्माचा सुंदर असा देखावा सादर करण्यात आला होता. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यानी ऑनलाइन कार्यक्रमात सहभाग घेऊन मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा केला. यावेळी शाळेचे प्राचार्य संजीवजी भारद्वाज , शाळेचे प्रशासकीय व्यवस्थापक व्यंकट हरीदास रेड्डी हे उपस्थित होते.
ख्रिसमस हा ख्रिश्चन धर्मियांचा अत्यंत महत्वपूर्ण सण आहे . या दिवशी गिरीजा घरात प्रार्थना करण्यात येते . शुभ कामना कार्डसची देवाण –घेवाण करण्यात येते . यावेळी ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या शुभेच्या देण्यात येतात .
ख्रिसमस उत्सवात विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . त्यामध्ये पहिली आणि दुसरीच्या वर्गासाठी ख्रिसमस ड्रेसपार्टी, तिसरी आणि चौथीच्या वर्गासाठी ख्रिसमस कहाणी वाचन , पाचवी आणि सहावीच्या वर्गासाठी ख्रिसमस संताचे चित्र रेखाटने , तर सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ख्रिसमस ट्रि सजावट आणि ख्रिसमसच्या खेळाचे आयोजन करण्यात आले होते . या विविध उपक्रमाच्या माध्यमातून कोरोना महामारीच्या काळातही आपण आनंदी राहण्यास सांगण्यात आले .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षिका मोहिनी दिक्षित ,मनीषा पाटील , प्रणाली दाभाडे , अश्विनी सिरसाठ , तसेच शाळेतील वरिष्ठ समन्वयक मुकुंदराज हुंबे , सांस्कृतिक समन्वयक संतोष दिपके शाळेतील शिक्षक किरण जोगी , नितिन इंगोले , मुकेश डहाळे , प्रदीप निमकर आणि प्रतीक बोरळकर यांनी प्रयत्न केले.
إرسال تعليق