बेवारस बाळाला स्तनपान देणाऱ्या सलमा सय्यद यांचा सत्कार
हिंगोली - आंबेडकर प्रेस कौन्सिल,
बांधकामगार,मोलकरीण संघटनेचा पुढाकार मोलकरीण संघटनेच्या पुढाकारातून शुक्रवारी( ता.२२) बेवारस बाळाला स्तनपान करून जीवनदान देणाऱ्या कर्तृत्ववान मातेचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरकारी अभियोक्ता ऍड. अनिल इंगळे हे होते, तर ऍड. रावण धाबे,संपादक हाफिस भाई ,प्रा. गजानन बांगर,
रेनबोचे संचालक विजय कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सहा दिवसापूर्वी बसस्थानकात अडीच महिन्याच्या बाळाला सोडून मातेने पलायन केल्यानंतर सकाळी बेवारस बाळ जोरजोराने रडत असल्याचे उघडकीस आल्याने शहर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याने या बाळास सामान्य रुग्णालयात उपचारासाठी शिशुगृहात दाखल केले. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर ,अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे, शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या बेवारस बाळाला स्वतःचे मूल समजून सलमा सय्यद यांनी स्तनपान दिल्याने बाळाचा आक्रोश शांत झाला.त्यामुळे बेवारस बाळास जीवनदान देऊन स्तनपान केलेल्या सलमा सय्यद , महिला पोलीस कर्मचारी सुरेखा अत्राम ,शारदा ढेम्बरे ,या मातेचा साडी चोळी, पुष्पहार देऊन सरकारी अभियोक्ता ऍड.अनिल इंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी सलमा सय्यद यांनी आपल्या मनोगतात म्हणाल्या की,बाळाला निपलच्या साहाय्याने दूध पाजविण्याचा प्रयत्न केला असता ही बाळाचे रडणे काही थांबत नव्हते,डॉक्टरांनी सांगितले निपल द्वारे दूध पाजल्यास लहान बाळास कर्क रोग होण्याचा संभव असतो. त्यामुळे मला काय करावे काही नाही असा प्रश्न पडला होता. शेवटी माझे बाळ समजून त्या बाळास स्तनपान केले असता क्षणार्धात बाळाचे रडणे थांबले. बाळ रडण्याचे थांबल्याने मला ही समाधान वाटल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर ऍड. अनिल इंगळे यांनी ही त्या पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतूक करून त्यांचे मनोबल वाढविले. सूत्रसंचालन ऍड. रावण धाबे यांनी केले तर सुधाकर वाढवे यांनी आभार मानले. कार्यक्रम यसस्वीतेसाठी विलास जोशी, रवी शिखरे, मनीष खरात, दयासील इंगोले, संतोष भिसे, अशोक पानपट्टे ,आदींनी परिश्रम घेतले.
إرسال تعليق