हिंगोली जिल्ह्यात कोरोना लसीची रंगीत तालीम यशस्वी कोविन ऍपद्वारे हिरवी झेंडी

जिल्ह्यात कोरोना लसीची रंगीत तालीम यशस्वी कोविन ऍपद्वारे हिरवी झेंडी

हिंगोली/प्रतिनिधी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शुक्रवारी कोविड -19 प्रतिबंधात्मक लसीची रंगीत तालीम (ड्राय रन) प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे. याचा पहिला प्रयोग आरोग्य कर्मचारी प्रियंका राठोड यांच्यावर करण्यात आला. हे प्रात्यक्षिक यशस्वीरित्या झाल्याचा संदेश कोविन ऍपद्वारे पाठविण्यात आला आहे. जगभरात थैमान घातलेल्या कोविड -19 वर लवकरच प्रतिबंधात्मक लस हिंगोली जिल्ह्यात उपलब्ध होणार आहे. त्या अनुषंगाने 8 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांच्या निगरानीत अप्रत्यक्ष लसीकरणास सुरुवात करण्यात आली 

   शासनाच्या आदेशानुसार
जिल्ह्यात नागरिकासाठी लवकरच लसीचा वापर
शिबिर द्वारे करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी
 करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी महाराष्ट्र 24 न्यूजला
बोलताना सांगितले

Post a Comment

أحدث أقدم